पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नोप उरा सर F श्रीतुकाराम. फडतों, केवढा आमचा मूर्खपणा आहे ? आजपावेतों माझें आयुध्य कवडीच्या मोलानें गेलें. रोज रात्री तुकारामाचे कीर्तनास गेलें झणजे असे वाटते की, जसा कांहीं अमृताचा पाऊस पडतो आहे ! आईबापाची आठवण नाहीं, राज्यप्राप्ति करून घेण्याची जरूर नाही. स्नेही नको, कुटुंब नको, कांहीं नको-(हंसून ) त्या मलांना फसविण्यास मला कांहींच उशीर लागला नाही. माझ्यावर त्यांचा पूर्ण विश्वास. मला त्यांनी मोहपाशांत अगदी जखडून टाकलें होतें. (आवाज होतो.) आतां येथें आवाज कसला झाला बरें ? मला वाटते, कोणी तरी श्वापद आले असावें. माझ्या मनाला भिण्याचें कांहींच कारण नाही. सर्वाभूती परमेश्वर सारखा भरलेला आहे. कोणाला कोणी ठार मारण्याचा अधिकार नाही. (सईबाई कड्यावरून गडबडत येऊन शिवाजीजवळ पडते.) सईबाई-(कण्हत कण्हत ) हिंडतां हिंडतां अगदी थकलें. तहानेने जीव कासावीस झाला. भूक लागली. कांहीं खावयास मिळेल म्हणून या कड्यावर चढू लागले, तो पाय घसरून खालीं पडले. सर्व अंग ठेचलें. अग आई आई ? (बेशुद्ध होते.) शिवाजी-कोण बरें ही स्त्री असावी ? माझ्या ओळखीची दिसते. आपल्याला काय, कोणी का असेना. तहानेने तिचे प्राण व्याकळ झाले आहेत. तिला पाणी पाजणे आपले काम आहे. भतदया हेच आमचे भांडवल. (तिच्या तोंडात पाणी घालतो.) अरे. ही तर आमच्या घरची माणसं! कसा मायापाश आहे ! या मर्खपणाला काय ह्मणावं ! आईनें तरी हिला एकटीला कशी मोडली असावी बरें ? पण आपल्याला असले विचार मनात आणणे योग्य नाही. सईबाई-(एकीकडे ) हे स्वप्न तर नाहींना ! ज्यांचा शोध करीत मी या जंगलांतून भटकत फिरत आहे, ते परमेश्वराच्या कृपेने माझ्या अगदी जवळच आहेत. आतां जीव गेला तरी है पाय झणून सोडणार नाही. आतां क्षणभर बेशुद्धपणाचे सोंग घेते. Fkar