पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. आली तर काही तरी निमित्त काढून यांना कामगिरीवर पाठवावें ह्मणजे झालें. ( उघड) तुम्ही कसें तरी करून एकदां गांठ घालून या, मग मला सोडून कसे जाणे होते आहे ते पाहते. सासूबाई, रंग, गंगू, पंडितराव, तानाजीराव, सगळे आमच्या शोधांत हिंडत असतील. देवा ! निदान सासूबाईची आणि माझी गांठ तरी पडूं देऊ नकोस, नाही तर त्या मला घरी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत. माझ्याच्याने त्यांच्यापुढे काही बोलवणार नाही. गोप्या-चला बाइसाहेब, त्या समुखल्या खिंडीमंदी जाऊ. सरकार तिथ खात्रीन भेटत्याल. (त्रिवर्ग जातात.) प्रवेश ३ रा. स्थळ-डोंगर. (शिवाजी प्रवेश करितो.) शिवाजी-कोणाचे आईबाप, कोणाची बायको, कोणाचा पुत्र, कोणाचा मित्र, संसारसुख केवळ अभ्राची सावली आहे. क्षणांत नाहीसे होईल. विषयाचे सुख ह्मणजे आकाशांतील विजेची चमक. संसार हे स्वप्न आहे. देह उपजतांच मृत्यूच्या तोंडी दिलेला आहे. मग माझें राज्य, माझी बायको, माझा मुलगा, माझें घर, माझें शेत, असें म्हणतांना आम्हांस लाज वाटू नये का ? ज्याप्रमाणे सर्पाने अर्धवट बेडूक गिळावा, त्याप्रमाणे काळानें आम्हांस ग्रासिलें आहे. मग तो बेडूक जसा, इकडे तर सर्पाने गिळीलेंच असते, परंतु आपण स्वतः पुढे माशा गिळीत असतो, त्याप्रमाणे आमची स्थिति आहे. आमचा उद्याचा भरंवसा नाही. काळ आम्हांला केव्हां दाढेखाली रगडन टाकील याचा नेम नाहीं. आम्ही इकडे ईश्वराला विसरून जाऊन एकमेकाला कवटाळतों, मनसोक्त चेन मारतों, नेहमी सुखप्राप्तीकरितां माशाप्रमाणे तर