पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. हाती सीतादेवीला आंगठी पाठवली होती, तशीच महाराजांना मला तुमच्या हाती पाठविली आहे. फरक इतकाच की, रामानीं सीतेचा त्याग केलेला नव्हता. महाराजांनी माझा त्याग केलेला आहे. गोप्या-पन बाईसाहेब सीतादेवीला मार्वतीन आंगुठी दिल्यावर त्या काय म्हंगाल्या ? सई०-त्या काय म्हणाल्या? त्याचे गाणे एक मला सासूबाईनीं शिकविलें आहे. तें आतां माझ्या ध्यानात येत नाहीं. गण्या-बाईसाहेब, म्हना की चुकतमुकत. म्हनजे देवाला तरी आपली दया येऊनशान सरकारची गांठ पडल. सईबाई-बरं तर म्हणतें अं भंगिले शिवधनुष्य श्रीरामें वरिलें मला॥ वनी आलों उभयतां बाई ॥ उभयतां बाई ॥ कांचनी मृग पाहिला ॥१॥ मनी वाटे मृग चुकला गे काचोळीला ॥ पुरवावी हौस ही माझी ॥ हौस ही माझी॥ मम वचनीं राघव गेला ॥२॥ दुर्वाक्य धरुनि मनिं छळिलें भाऊजिशी ॥ हे पाप साजणि मी अंगीं ॥ साजणि मी अंगीं ॥ भोगिते दिवसानिशीं ॥ ३ ॥ध्रु०॥ मुद्रिके राम टाकून आलिस तूं कशी ॥ हा वृत्तांत सांग मान बाई॥ सांग मज बाई॥ सोडि मौन्य बोल तूं मशीं ॥४॥ सद्दीत जानकी मुद्रे हृदयीं धरी ॥ ह्मणे माये आण तुज माझी ॥ आण तुज माझी ॥ खरें राम आहे कुठे तरी ।। १ ।। एकली वनांत दिन मी अनाथ मुद्रे अशी ॥ किति दिवस लोढुं क्लेशांचे ॥ लोटुं क्लेशांचे ॥ जिवनाविण मासळी जशी ॥२॥