पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/90

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

फैलावू लागला. चौकाचौकात, गावोगाव डॅनी गर्जत होता- अखेरचा भांडवलशहा सुळावर चढला पाहिजे. त्याबरोबरच अखेरच्या नोकरशाहीची आतडी लोंबकळताना दिसली पाहिजेत. त्याशिवाय मानवजात सुखी होणार नाही. मागे वळून पाहू नका, जुने जग कोसळत आहे. रस्ते रोखून धरा. सोडू नका-' आणि खरोखरच सहस्रावधी विद्यार्थी रस्ते रोखून धरीत होते, हटत नव्हते, पोलिसांशी दोन हात करू लागले होते, शिक्षणसंस्थांवर चालून जात होते, वाहनांची मोडतोड करीत हाते, बॉम्ब्स फेकीत होते, आणि कायदा धाब्यावर बसवून लाखालाखांच्या मिरवणुका-मोर्चे काढीत होते.

पॅरिसमध्ये व्हिएटनामच्या वाटाघाटींची तयारी पूर्ण झाली होती. अमेरिकन व व्हिएटकॉग शिष्टमंडळांना विद्यार्थी-उठावाचा उपसर्ग पोचू नये म्हणून वाटाघाटींच्या स्थानाकडे जाणाऱ्या सर्व वाटा पोलिसांनी रोखून धरल्या होत्या. तरी एक विद्यार्थी-मोर्चा तिकडे निघालाच. सेन नदीच्या एका पुलावर पोलिसांनी तो अडवला. विद्यार्थी पांगण्याऐवजी तटबंद्या रचून त्यांच्या आड दडले व त्यांनी ' खुनी द गाॅलचे हस्तक' म्हणून पोलिसांवरच हल्ला चढवायला सुरुवात केली. फूटपाथवरचे दगड उपसून, झाडे तोडून, वाहने अडवून विद्यार्थ्यांनी या तटबंद्या रस्त्यात उभ्या कल्या व त्याआडून पोलिसांशी आपले प्रतिकारयुद्ध जारी ठेवले. लॅटिन क्वार्टर्स विभागात रात्ररात्र या चकमकी चालू राहिल्या. ऐनवेळी या तटबंद्या रचण्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना कोणी दिले ? तोडमोडीला लागणारे साहित्य कुठून जमा झाले? विद्यार्थ्यांची मानसिक तयारी केव्हा झाली ? रुमाल आडवे धरून विद्यार्थी अश्रधुरापासून स्वतःचा बचाव करून घेत, काहींनी शिरस्त्राणे, ढाली यांचाही वापर कला, हे सारे त्यांना कोणी पुरवले? जखमी विद्यार्थ्यांना नागरिकच आपल्या घरात घेऊन उपचार करीत होते, पोलिसांचे लक्ष जाऊ नये म्हणून कोवळीकोवळी मुले आडोशाला लपून आपल्या जखमावर आपणच गुपचूप इलाज करीत होती.

पाच-सातशे विद्यार्थी जेव्हा जखमी होऊन इस्पितळात पडले, घराघरात शिरून जेंव्हा पोलिसांनी अत्याचार केले, रेडक्रॉससारख्या संघटनेला जेव्हा विद्यार्थ्यांच्या शुश्रुषेला व मदतीला जाण्यास सरकारतर्फे बंदी करण्यात आली, तेव्हा संतापाची तीव्र लाट साऱ्या देशभर उसळली आणि शिक्षणसंस्था धडाधड बंद पड लागल्या. काहींवर तर विद्यार्थ्यांनी आपला अंमलच सुरू केला. देशातील तेवीस विद्यापीठांवर विद्यार्थ्यांचा ताबा होता, इतर अनेक विद्यापीठांनी सर्व सरकारी बंधने झुगारून आपली स्वायत्तता उद्घोषित केली होती. शिक्षक-प्राध्यापक वर्ग आता उघडउघड विद्यार्थ्यांबरोबर मिरवणक-मोर्च्यात, निदर्शनात सहभागी होऊ लागला होता. विद्यार्थ्यांच्या ताब्यात आलेल्या विद्यापीठातून, कॉलेजातून नव्या शिक्षणक्रमाविषयी, नव्या समाजव्यवस्थेसंबंधी घनघोर चर्चा झडू लागल्या. विद्यार्थी-कामगार

। ८३ ।