पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुरुषार्थाच्या मुळाशी असणारी आत्मशक्तीच येथे प्रथमपासून खच्ची होत आलेली आहे, पद्धतशीरपणे केली जात आहे.

तेव्हा हे परदेशी मदतीचे नवे साखळदंड आपण खटाखट तोडले पाहिजेत. निदान अन्नाबाबत तरी आत्ताच, या क्षणीच निर्णय घेऊ. दहा टक्केच तूट आहे ना ? हरकत नाही. भागवून घेऊ; पण ताबडतोब परकीय अन्नमदत थांबवा, असे शासनाला एकमुखाने सांगू. ती पावबिस्किटे आणि दुधाच्या पावडरी तर समुद्रात फेकून द्या. लहान वयात, कोवळया बालमनावर कसले गुलामीचे, लाचारीचे घाणेरडे संस्कार करता ? एकही 'श्यामची आई' निघू नये की जिने या पसरल्या जाणाऱ्या हातांवर चरचरून डाग द्यावा आणि मुलाची वेदना स्वतःलाही डागून घेऊन भोगावी ?

एक वेळ भूकबळी होऊ; पण हे भीकबळी होणे नाही, हे आता सर्वांनी ओरडून सांगितले पाहिजे. शक्यता आहे की भूकबळी ठरण्याची वेळ येणार नाही. कारण दहा टक्के तूट आहे तर दहा टक्क्यांच्या आसपास नासधूसही आहे. जास्तीच पण कमी नाही. पाकिस्तानकडे, चीनकडे चोरट्या मार्गांनी किती धान्य जाते याचा काही हिशेब ! साठेबाजांविरुद्धही लोकमत जागृत केले पाहिजे. मग ही साठेबाजी श्रीमंत शेतकऱ्यांची असो, व्यापाऱ्यांची असो की शिलकी अन्नधान्यांच्या राज्यांची असो. प्रांतबंदी आडवी येत असेल तर ती उठवली पाहिजे, जिल्हाबंदी तोडली पाहिजे. एकदा परकीय मदतीचे दोर कापले की, पळ काढण्याला आपल्याला वाव रहाणार नाही; युद्धपातळीवरून सर्वच शेतीव्यवस्थेच्या पुनर्घटनेचा विचार आपण सुरू करू. लढा नाही तर मरा असे दोनच पर्याय तेव्हा आपल्यासमोर असतील आणि शक्यता आहे, एखाद्या सूर्याजीच्या नाही तर शेलारमामाच्या नेतृत्वाखाली गडावर स्वातंत्र्याचे आणि समतेचे निशाण फडकू लागेल.

यासाठी आम्ही निघायचे ठरविले आहे. ज्यांना शक्य आहे, येणे योग्य आहे असे वाटत आहे, ते येतील अशी आशा आहे. एक आवाज तर उठवू ! संघटना, पक्ष येतील न येतील, शासन ऐकेल न ऐकेल. पण इतकी विटंबना चालू असताना आपण निपचीत पडून राहणे हे पाप तरी टाळू ! वेरूळच्या भव्य कैलासलेण्यापासन थेट मंबईच्या चौपाटीपर्यंत चालत चालत, लोकांशी हे विचार बोलत बोलत, मा घेत. प्रचार करीत जायचे आहे. निघण्याचा दिवस : २६ जानेवारी. तीस वर्षापूर्वी रावीच्या तीरावर स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र होण्याचे महान् स्वप्न जेव्हा देशाला पडले तो दिवस! हे स्वप्न अजूनही अपुरेच आहे. स्वतंत्र झालो. सार्वभौम आहोत की नाही याची शंका आहे. या सार्वभौमत्वाच्या साक्षात्कारासाठी, समर्थ राष्ट्रीयत्वासाठी, प्रचीतीच्या पुरुषार्थासाठी, आत्मसन्मानासाठी हे संचलन

। ७२ ।