पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाघुळदे; महारू एको सरोदे, फैजपूर; गोविंद लहानू चौधरी, खिरोदे; सोनु तुकाराम पाटील, कुटुंबनायक, पाडळसे; डी. एम. राणे, वकील, यावल; डी. टी. चौधरी, वकील, भुसावळ; बी. डी. राणे, व्हा. प्रे. भुसावळ म्यु. बरो.(वरील पत्रक फैजपूरचे श्री. कुलकर्णी यांच्या छापखान्याच्या माळ्यावर शोधाशोध करीत असताना मला सापडले. माणूस अंकात लेखासोबत मी या पत्रकाचा ठसाही छापला. त्यामुळे काँग्रेसच्या नावावर स्वातंत्र्यानंतरच्या काळात सत्तास्थाने उपभोगणाऱ्या पण छत्तीससाली काँग्रेसला विरोध असलेल्या अनेक मंडळींना राग आला. त्यांनी फैजपुरात सभा घेऊन लेखाचा निषेध केला व अंकाची होळी केली असे नंतर समजले.

--लेखक)


*

। ३९ ।