पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/194

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काचा एक महत्त्वाचा विषेश हा की, या मूल्याच्या स्वरूपाबद्दल ते आपल्याला वांरवार डिवचून अस्वस्थ आणि अंतर्मुख करत रहाते.

: 3 :

 माजगावकरांच्या विचारांच्या मागे आणखी एक तळमळीची प्रेरणा आहे. ती म्हणजे स्वदेशी नियोजनाची. या 'स्वदेशी नियोजना' बद्दल मात्र आणखी पुरेशी चिकित्सा व्हायला हवी.

 स्वदेशी नियोजनाचाच एक भाग म्हणून वर सांगितल्याप्रमाणे माजगावकर स्वावलंबनाच्या नैतिक प्रेरणेला महत्त्व देतात. उद्योगधंदे, शिक्षण, यंत्रज्ञान या सर्व बावतीत आपण शक्य असेल तेथे आणि तितकी आपली माणसे, आपली साधने, आपल्या नैसर्गिक परिस्थितीनुसार आपली सामग्री वापरली पाहिजे असा वारंवार आग्रह धरतात. माजगावकरांचा हा आग्रह मंजूर करूनही स्वदेशी संयोजन म्हणजे केवळ स्वावलंबी संयोजन नव्हे. एक तर असे आहे की, आर्थिक विकास व प्रगती याच्या शर्यतीत पाश्चात्य आणि मिश्र अर्थव्यवस्थेची लोकशाही राष्ट्र, समाजवादी आणि साम्यवादी हुकुमशाही समाज हे आपल्यापुढे किमान काही दशके तरी पुढे आहेत. काळाचे हे अंतर हा एक महत्त्वाचा घटक आहे. कारण या तिन्ही गटांचे अयाग, त्यातील यशापयश, त्यामुळे या समाजांना घालाव्या लागणाऱ्या मर्यादा आणि मुरडी-हा सर्व आंतरराष्ट्रीय संदर्भ स्वीकारल्यावाचून आपल्याला आपल्या नियोजनाचा आराखडा काढणे अशक्य आहे. हा संदर्भ केवळ अटळ असल्यामुळे शुद्ध अंतर्गत असे स्वदेशी नियोजन हे एक पोकळीतले बोलणे आहे. थोडक्यात, स्वदेशी संयोजनाची स्पष्ट निश्चित अशी आकृती आज आपल्याजवळ नाही आताच सांगितलेला आंतरराष्ट्रीय संदर्भ वारंवार तपासून त्यातले बरेवाईट निवडून आणि भविष्यातील काही अनपेक्षित शक्तीचे आघात घेऊन ही नियोजनाची आकृती आकार घेत जाणार आहे.

 माजगावकरांना या संदर्भाचे भान आहे; पण ते सततचे नाही. काही वेळा स्वावलंबनाच्या नैतिक प्रेरणेने नियोजन करणे,'शेवटी मुक्तिसंग्राम म्हणजे तरी काय? तुझे आहे तुजपाशी हे ओळखणे' ('ग्रामायन' पृ. १४३) असे ते म्हणतात आणि स्वावलंबन म्हणजे स्वदेशी नियोजन असे चकीचे समीकरण मांडतात. तर काही वेळी कळत न कळत ग्रामीण आणि शहरी अशा दोन भिन्न संस्कृतींची उद्योगपूर्व समाजरचना गृहीत धरतात. उदाहरणार्थ, ग्रंथाच्या प्रास्ताविकातील ही वाक्ये पहा - 'आज शहरे वाढताहेत. ग्रामीण भागाचे अहर्निश शोषण सुरू आहे. अर्थव्यवस्थेचा समतोल यामुळे ढळला आहे. हे थांबले नाही तर ? जे प्राचीन काळी कार्थजचे, अथेन्सचे झाले किंवा मोहोंजोदोरोचे झाले, ते उद्या आपलेही होईल. सोन्याची

। १८७ ।