पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/193

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वगैरे ( माजगावकरांचे ) बोलणे कसे काव्यमय आणि अव्यवहारी आहे असाही वाद घालता येईल. (माजगावकरांचे म्हणणे अर्थशास्त्रीय कसोटयांवर अगदीच तसे पोकळ नाही असेही सिद्ध करता येईल, असा माझा एक अस्पष्ट तर्क आहे. पण हा माझा अभ्यासाचा विषय नाही. ) तथापी आर्थिक विकासामागे काही नैतिक प्रेरणा असतात, आणि पाश्चिमात्य राष्ट्रांच्या आर्थिक इतिहासात कामाबद्दलच्या नैतिक प्रेरणांचे ( work ethics ) कार्य उपेक्षणीय नाही हे आपल्याकडील पंडित' अर्थशास्त्रज्ञांना पूर्णपणे उमगलेले नाही. एकूणच आर्थिक विकास हा केवळ आथिक घटकांनी निश्चित होत नाही. त्यापाठीमागे त्या त्या संस्कृतीतील जीवनमूल्ये, सामाजिक भूमिका, समाजसंस्था आणि लोकांचे चारित्र्य हे महत्त्वाचे घटक आहेत, याचे भान आता सगळ्यांनाच येऊ लागले आहे. फक्त बचत-गुंतवणूक-भांडवलनिर्मिती, मजुरांची उत्पादनक्षमता, यंत्र-तंत्र हेच अर्थशास्त्रीय आडाखे लावून आशियातील समाजांच्या आर्थिक प्रगतीची मीमांसा करु पाहाणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांचे गुन्नार मिडलसारख्यांनी आपल्या 'एशियन ड्रामा' मध्ये अक्षरशः वाभाडे काढले आहेत, हेही या संदर्भात सांगितलेले बरे.

 वर उल्लेखिलेल्या सामाजिक घटकांचा विचार या पुस्तकाच्या परीक्षणात पुढे होणारच आहे. तूर्त इथे इतकचे सांगावयाचे आहे की, माजगावकर स्वावलंबनाच्या ज्या प्रेरणेचा आग्रह धरीत आहेत, तिची पाळेमुळे मूलतः सांस्कृतिक आहेत. भारतातील राजकीय नेते, प्रज्ञावंत, नोकरशाहीतील अधिकारीवर्ग आणि सर्वसाधारण जनताऱ्या तिघांच्याही स्वभाव-प्रवृत्तींचा आणि आर्थिक विकासाचा ध्येयवाद आणि वेग यांचा नक्कीच संबंध आहे.

 या दृष्टीने सर्वात खटकणारी गोष्ट म्हणजे आपल्या वरच्या वर्गाच्या दोन प्रकारच्या मानसिक प्रवृत्ती. एक म्हणजे पाश्चात्य किंवा साम्यवादी देशांच्या वरवरच्या चिकित्साशून्य अनुकरणाची अन् दुसरी, त्यामागच्या आत्मविश्वासाच्या संपूर्ण अभावाची. या दोन्ही प्रवृत्ती एकमेकांतून निर्माण होतात. मला स्वतःला दुसरी प्रवृत्ती भ्रष्टाचार वगैरेपेक्षाही अधिक काळजी करण्याजोगी वाटते. शिक्षणक्षेत्रातील अभ्यासक्रम आणि माध्यमाचे प्रश्न, प्रायोगिक नाटके, समान नागरिकत्वाचा कायदा कुटुंबनियोजन-सर्वच ठिकाणी आपल्या राष्ट्रीय आत्मविश्वासात आणि निर्णय घेण्याच्या सामर्थ्याला जणू पक्षघात झाला आहे, इतक्या लुळ्या पंगू अस्मितेने आपण वावरत आहोत. हा आत्मविश्वास जागा करुन तो आपल्या व्यक्तित्वात भिनवायचा असेल तर आर्थिक क्षेत्रात एक किमान गुणवत्ता आणणे हाच आपल्या राष्ट्रवादाचा आविष्कार झाला पाहिजे. अथिक विकास हे केवळ एक भौतिक मूल्य नसून ते एक उच्चतम सांस्कृतिक मूल्य म्हणून प्रस्थापित झाले पाहिजे. माजगाकरांच्या पुस्त

। १८६ ।