पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/164

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कारी संस्थेचा मी अध्यक्ष आहे. माझ्या पूर्वीच्या अध्यक्षांनी तीन हजार रुपयांची अफरातफर केलेली होती. मलाच ते प्रकरण कोर्टात न्यावे लागले. गुन्हा शाबीत झाला. ते सद्गृहस्थ सध्या तुरुंगाची हवा खात आहेत. असे करण्याशिवाय आज ख-या लोकसेवकाला गत्यंतर उरलेले नाही आणि मी स्वतःला गांधी-विनोबा परंपरेतला लोकसेवक मानतो हे मी सन्माननीय न्यायमूर्तीसमोर सुरुवातीलाच स्पष्ट केलेले आहे.'

न्यायमूर्तीनी शेवटी निकाल दिला... I, therefore, acquit the accused. आरोपी निर्दोष आहे.

संपादकाने या प्रकरणाचा समारोप करताना अंकात आणखी एक टोला लगावलाचः

'लखनौचे मोगल राज्यकर्ते न्यायमूर्तीच्या या निकालपत्रावरून काही बोध घेतील काय ? यंत्रचारी आणि एक्झि. महाशय यांच्याविरुद्ध आता भरपूर पुरावा पुढे आलेला आहे. नलिका कूप खात्याच्या जंगलात दडून लहान शेतक-यांची लूटमार करणा-या या दरोडेखोरांचा सरकारने आता निकालच लावला पाहिजे. पण शासन असे काही न करण्याचीच शक्यता अधिक. त्यामुळे प्रस्तुत लेखकासारख्या इतर अनेकांना आपल्या हातातील नांगरांचे आणि लेखण्यांचे तोफा–बंदुकात रूपांतर करण्याशिवाय मात्र पर्याय उरणार नाही, हे शासनकर्त्यांनी ध्यानात घ्यावे.'


लखनौच्या मोगलांची झोप काही यामुळे उडाली नाही हे खरे. पण त्यांनी डोळ थोडेसे किलकिले करून पाहिले मात्र. या एक्झि. + यंत्रचारी जोडीच्या दोन-तीन महिन्यातच बदल्या करण्यात आल्या. किमान एवढेही न करून कसे चालले असते ? कारण संपादक दरम्यानचा काळातही स्वस्थ बसलेला नव्हता. त्याने या जोडीच्या नवीन काही लीला उघडकीस आणल्या. विशेषतः एक्झि. महाशयांच्या कारण हो मोठी शिकार होती. ही साधण्यात संपादकांचा गौरव होता. अखेर ती साधलीही. पण अर्धवट. फक्त बदली ! जनावर जखमी झाले. ठार मरून पडले नाही. संपादकांचा लोकशाहीवरचा विश्वास थोडा अधिकच डळमळीत झाला असावा.

खारी गावातील शिवमंदिरात हा संपादक-सुधारक हरिजनांना घेऊन प्रवेश करता ज्ञाला-याचा स्वतःचा देवळातील देवावर विश्वास होता की नाही देवच जाणे. गावातील सनातनी हिंदू डिवचले गेले, खवळले. चक्क याच्यावर लाठ्याकाठ्या घऊन धावले. हा समरप्रसंग नेमका केव्हा, कसा व कुठे घडला याची मात्र अंकात नदि नाही. संपादक येथील ‘बिजनौर टाईम्स' कचेरीत एकदा गप्पा मारीत बसला

                 |१५७|