पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/163

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 होईपर्यंत यंत्रचा-याला पुन्हा डॅबिसगिरी करण्यास वाव राहू नये म्हणून थोकदाराने कूपाला आपले कुलूप ठोकले. केवढा भयंकर गुन्हा ! ' थोकदाराला हातकड्याच पडायच्या. पोलीस दयाळू निघाले. नशिब समजा'- एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने या संपादकांना आपला अभिप्राय नंतर ऐकवून गप्प केले होते. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ट्यूब वेल्स, बिजनौर यांचेकडे या वशिष्ट यंत्रचारी-कूप रक्षक जोडीविरूद्ध अनेक तक्रारी नोंदवून झालेल्या आहेत. या जोडीची तात्काळ बदली करावी अशी येथील शेतकरी प्रतिनिधींनी लेखी मागणी त्यांचेजवळ केलेली आहे. एक्झि. महाशय तरीही टोलवाटोलवी करीत आहेत, ती खासच आता संशय उत्पन्न करणारी आहे. ही परिस्थिती फार काळ सहन करणे अशक्य आहे. एक्झि. महाशयांनी सावध रहावे. एखादा लुटला जात असलेला शेतक-यांचा प्रतिनिधी त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय रहाणार नाही हे त्यांनी खूप समजून असावे. चीफ इंजिनियर, पाटबंधारे, लखनौ यांनाही आम्ही या लेखाद्वारे अशी प्रकट विनंती करतो की, त्यांनी या भागाला ताबडतोब भेट द्यावी व नलिका कूप खात्यात राजरोस, दिवसाढवळ्या चालू असलेल्या या लुटमारीला व चोरबाजाराला आळा घालावा. भ्रष्ट राजवटी असंतोषाच्या वणव्यात जगभर धडाधड कोसळत आहेत हे या मख्ख नोकरशहांच्या ध्यानात कसे येत नाही ?वणव्याने अशी काही शपथ घेतलेली नाही की, तो हिंदुस्थानात भडकणारच नाही. व्हॉल्टेरचे सामर्थ्य असलेली लेखणी या भूमीत अस्तित्वात नाही असे कोणी समजू नये. व्हॉल्टेरने इतका भडिमार केल्यावर शासनयंत्रणा स्वस्थ कशी रहाणार? □अब्रू नुकसानीची फिर्याद संपादकावर गुदरली गेली. □दहा-पाच वकील संपादकासाठी फी न घेता काम पहायला आपणहून पुढे आले. □आसपासच्या गावचे शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांनी संपादकाच्या बाजूने साक्षी दिल्या. फिर्यादी पक्षाने आणलेल्या साक्षीदारांपैकी काही तर तुरुंगातली खडी फोडून नुकतेच बाहेर पडलेले सरकारी पाहुणेच निघाले. □संपादकाने कोर्टासमोर आपली भूमिका आणखीनच ठणठणीतपणे मांडली- 'नोकरशाहीने गोरगरीब जनतेची लूटमार चालविली असता डोळ्यावर कातडे पांघरून स्वस्थ रहाणे हे माझ्या परंपरेत नाही, स्वभावात नाही. 'लुटारू' हा लेख मी काही कुणा व्यक्तीच्या आकसापोटी लिहिलेला नाही. मला या देशात स्वच्छ शासन हवे आहे आणि त्यासाठी मी अहर्निश चालवलेल्या झगड्याचाच हा एक भाग आहे. वेळ पडलीच तर लेख लिहिण्यापलीकडेही मी याबाबत जात असतो. सहाच महिन्यापूर्वी येथील जिल्हा न्यायाधीश व पोलीस अधीक्षक यांचे सहकार्य मिळवून, पूर्वनियोजनपूर्वक एका जलविद्युत खात्यातील पर्यवेक्षकाला, तो लाच स्वीकारीत असता मी जाळ्यात पकडून दिलेले आहे. खारी गावच्या विणकर सहा-

                । १५६ ।