पान:श्रीगोपगडमणि.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सखीसंवाद नाटिका नामक ग्रंथ रचिला. त्यांत भरतवर्षाची प्राचीन व अर्वाचीन स्थिति; तत्कालीन देश, शहरें; हल्ली झालेले त्यांचे नामांतर; इंद्रप्रस्थ (दिल्ली) येथे युधिष्ठिरापा. सन अखेर अखेर यवन बादशाहांपावेतों झालेले राजे गोपगड व त्यावर झालेले राजे; व्यावहारिक ज्ञानदर्शक बालोपदेश; व मणि (मराठे, पेशवे, शिंदे इतिहास वर्णन काव्य) ही प्रकरणे लेखनावश्यकसाधन-पात्रता कल्पून लिहिली. द्रव्याभावामुळे हा विस्तृत ग्रंथ आजपर्यंत मला छापून प्रसिद्ध करितां आला नाही, याजबद्दल फार दिलगिरी वाटते. तथापि ग्वाल्हेर किल्ल्याचा इतिहास फार मनोरंजक असून तो आजपर्यंत प्रसिद्ध झाला नाही. तरी तो, व मणिकाव्य ही प्रकरणे संक्षिप्त छापून प्रसिद्ध करण्याविषयी काही विद्वान लोकांनी सूचना केल्यावरून, हे लहानसें पुस्तक छापिलें आहे. रसिक जनांस रसयुक्तपदार्थ यथेष्ट न मिळाल्यास त्यांची तृप्ति होत नाही. तथापि अल्पस्वल्प रुचीवरून त्याची योग्यता पूर्णपणे त्यांच्या अनुभवास येते. पहा-... श्लोक.APART ॥ अतृप्तिपर्याप्तमिति त्यति ॥ || नस्वादसूक्तस्यरसंरसज्ञाः। VI द्राक्षाल्पसारापिनितान्तमिष्टा ॥ ॥ जनस्य कस्यास्ति न भोक्तुमिष्टा ।। तद्वत् या अल्पग्रंथाचे होऊन, तो भक्तकामकल्पद्रुम श्री. माधव समग्र ग्रंथ छापण्याचा लवकरच योग आणाल अशी आशा आहे.