पान:श्रीगोपगडमणि.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. वाचकहो, हे भरतवर्ष परराष्ट्रीयांच्या तडाक्यांत सांपडून दिवसेंदिवस वाढत्याप्रमाणानें निर्धनावस्थेत कालक्षेप करीत आहे. त्यांतही, 'श्रीनिवास' व 'नाविष्णुः पृथ्वीपतिः' या उभयालंकारांनी युक्त असे जे भाग विद्यमानकाळी दुंदुभीरवयुक्त आहेत, त्यांची संख्या खरोखर हाताच्या बोटांइतकीही नाही. हर! हर! तथापि, भवानीयुत ज्याचा कर; शरणागतरक्षक ज्याचें पद; गोहत्यादि दुष्कृ. तिपटुजनांचा समूळ नाश करण्याविषयीं जो सदैव बद्धपरिकर; दुष्ट यवनांच्या काळदाढेसमान शस्त्रांसही दाद न देणारें वज्रमय चिलखत ज्याच्या देही वास करणारे; परस्त्रीमातेसमान असा ज्याचा भाव; गोसुरविप्रपदी नम्र ज्याची मणियुत कंधरा; आणि श्रीमद्रामदासगुरुपदारावंदी मिलिंदायमान ज्याचें तन, मन, धन; अशा त्या छत्रपति शिवाजी महाराजांच्या प्राचीन साम्राज्याच्या शिंदे, होळकर व गाय कवाड या आधुनिक श्रीवरदत्रिमूर्ति दर्शक होत. ह्यांतील -आद्य श्री. राणोजीराव शिंदे, ह्यांच्या वंशांतील कुलभूषण, वीरावतंसोत्तम श्री. माधवराव म० सा० ह्यांचा अधिकारोत्सवदिन (ता. १५ डिसेंबर सन १८९४ इ०) ह्या भरतखंडांतील हिंदु ज्ञातीयांस महानंददायक होय. अशा ह्या सुदिनीं सेवक नात्याने अभिनंदन प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने प्रजाजनशिशूच्या महाराष्ट्रभाषाभ्यसनांत उपयुक्त