पान:श्रीगोपगडमणि.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीगोपगडाचा (ग्वाल्हेर किल्लयाचा) संक्षिप्त इतिहास. .३० स० २७५ वे वर्षों मौजा सोहनिया (वाल्हेर शहरापासून १२ मैलांवरील गांव) येथील शूरसेन नामक कछवाह ठाकूर गोपाचलावर शिकारीस्तव आला होता. ह्यास कुष्टरोग फार झाला होता. तो हरिणाचे मागे लागून पळतां पळतां थकला, परंतु ते सांपडले नाही. ठीकच होय; सिद्धाश्रमांतील प्राण्याचा वध करण्याविषयी उद्युक्त झालेल्या मनुष्याचा मनोरथ कसा पूर्ण होईल ? ते उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे, अतितृषाक्रांत होऊन शूरसेन जलाचा शोध करूं लागला. त्यावेळी अरण्यांत त्यास कोणी मनुष्य भेटले नाही. सुदैवेंकरून, ज्या ठिकाणी श्रीग्वालिपासिद्ध तपश्चर्या करीत ब्रह्मानंदांत निमग्न होते, तेथें ठाकूर आला, व एकदम, नग्न अवधूत अशा स्थितीत सिद्धांस अवलोकन केल्यावर, त्यास किंचित् भय वाटले. सिद्ध हे ब्रह्मानंदांत निमग्न होते. आता पुढे काय करावे ? अशा विचारांत ठाकूर गोंधळला. परंतु, त्याने साधूलोकांबद्दल अशा काहीं गोष्टी ऐकिल्या होत्या की, ते जगाचा त्याग करून एकांत अरण्यांत ब्रह्मानंदांत सदैव निमग्न राहून, निरुपद्रवी असतात. या गोष्टीवरून त्यांपैकीच हे आहेत, यांत संशय