पान:श्रीगोपगडमणि.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२७) कण्हेरखेडी पाटिल शिंदे, राणोजीरावा || जयाजि, दत्ताजी, जनकोजी, महादजी छावा ॥१॥ राणोजीच्या पश्चात् झाले, जयाजि भूपवर ।। नव वर्षे राज्याधिकार करि, विजयशिंगसमर ॥ २ ॥ पुढे भूपती जनकोजी ते, दत्ताजी पडले ॥ पानपती मग माहादाज़ी, सिंहासनि बसले ॥ ३ ॥ राज्य करी तेहतीस वर्षे, पुत्रापरि पाळी ॥ प्रजा सर्वदा वडगांवीं जो, आंग्लां निर्दाळी ॥ ४ ॥ श्रीमद्दौलतराव भूपती, झाले मग पुढती ।। मुकुटराव त्या नांव ठेविलें, जनकोजी नृपती ॥ ५ ॥ अलिजॉबहादुर जयाजि नृपती, जिसिएसायगणीं ॥ अग्रेसररणदानशूर जणुं, कर्णचि हा अवनीं ॥६ काय सांगुं सखि हर्ष वर्षला इ० ॥ २४ ॥ तत्सुत युवनृपराजमणी हे, वीरश्री सजणी ॥ श्रीमन्माधवभूपति विलसति, जयेंद्रसद्भुवनीं ॥१॥ त्यांतें राजपदार्हचि जाणुनि, केसर-ई-हिंद ।। डी, डल्ब्य, के, बार लष्करी, पाठवि देउं पद |॥ २ ॥ सन अठराशें चौऱ्याण्णवच्या, डिसेंबरी पंध्रा ॥ दिवशीं वद्य तृतिया मार्गी, देती अधिकारा ॥ ३ ॥ श्रीस्वामीकर राष्ट्रसूत्रयुत, उत्सव होत जनी -11 स्वामिनिष्ठितप्रजामहामह, वर्णी कवि कवनीं ॥४॥