पान:श्रीगोपगडमणि.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२६) लढाइ खडकीची सन अठराशे-सत्रासाली ॥ तीत हरुनिया साताऱ्याची, वाट नृपें धरिली ॥ २॥ कोरेगांवी लढाइ केली, इंग्लिश लोकांनी ॥ पराक्रमाचे स्मारक दिसतो, रणस्तंभ अजुनी ॥ ३ ॥ स्मीथ मराठा सन अठराशेसत्रामधिं समरी ॥ अष्टी लढती होय बापुवध, हरीस आंग्ल धरी ॥ ४ ॥ सन अठराशेअठामधिं मग बाजिराव शरण || मालकमातें जाई सखये, राज्या सोडून ॥ ५ ॥ शरणागतास नेमणूक दे, आठलक्ष सजणी ॥ ब्रह्मावर्ती इंग्लिश ठेवी, विभव सर्व हरुनी ॥ ६ ॥ काय सांगु सखि हर्ष. वर्षला इ० ( २२) बाजीदूतत्र्यंबकजीतें, खानदेशि धरुनी ॥ - इंग्लिश ठेवी चुनारदुर्गी, जन्मकैद करुनी ॥ १ ॥ असे पेशवेदरबारामधिं, वकील एल्फिन्स्टन् || जितप्रदेशी मुख्य होई दे, कैकजना पेन्शन् ।। २ ॥ फार चतुर साहेब मराठी, राज्याचा ज्ञाता ॥... पंताश्रितगत-वैभवांसि जो, झाला सुखदाता ॥ ३ ॥ कैकजनांतें जाहगिरी दे, वर्षासनहि किती ॥... देवस्थाने आणि इनामें चालवि पूर्वरिती ॥ ४ ॥ दंगे-धोपे मोडनि सारे, रयतेला न्याय ॥ देइ; निरंतर बंदोबस्ती, झिजवी तो काय ॥ ५ ॥ जनोपकारामहत्कृती करि, नानाविध सजणी || स्मरण करूनी अद्यापी त्या. गाती कीर्ति जनीं ॥ ६ ॥ . काय सांगु सखि हर्ष वर्षला इ.० ॥ २३ ॥