पान:श्रीगोपगडमणि.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२५) बाजीरावें हस्ती-पादी, विठोजिहोळकरा ॥ बांधुनि वधिलें ऐकुनिया यश-वंत येइ निकरा ॥ ३॥ पराभूत ते बाजी शिंदे, सिंहगडी गेले ॥ तेथुनि वसई इंग्लिशलोकी, आश्रयास आले ॥ ४ ॥ यशवंत तदा विनायकातें, स्थापी पंतपदीं ॥ 1 धन्य, धन्य, जय वास करी त्या, श्रीयशवंतपदीं ॥ ५ ॥ सन अठराशे-दोनमधीं तह, करिति वसइभुवनीं ॥ इंग्लिश बाजीराव उभयतां, इंग्लिश होत धनी ॥६॥ काय सांगुं सखि हर्ष वर्षला इ० (२०) सन अठराशे तीन मधीं तो, पुनरपि बाजि बसे ॥ अष्टलक्ष नेमणूक घेउन, कार्शित अमृत वसे ॥ १ ॥ इंग्लिश-लष्कर घोडनदीच्या, तीरीं करि वस्ती ॥ घोडनदी जन हिंदू इंग्लिश शिरूर त्या वदती ॥२॥ क्रूर डेंगळा त्रिंबकजी जो बाजिराव-दूत ।। मुखत्यारीने कारभार करि, जनांस मारि जित ॥ ३ ॥ नृपसिंहासनि बसल्यावरती, बाजि जनांस छळी ॥ इंग्रजांस हांकून लावणे त्र्यंबक लावि कळी ॥..४ ॥ गायकवाडीखंडणिवादा, पटवर्धन आले ॥ पुण्यास गंगाधरशास्त्री तैं, आंग्ली अभय दिलें ॥५॥ बाजिबरोबर वकील गेले पंढरपुर-भुवनीं ॥ वधवी नृप अठराशेपंधी, त्र्यंबकहातोनी ॥ ६ ॥ काय सांगुं सखि हर्ष वर्षला इ० (२१) सन अठराशेसत्रामाधं त्या, नवीन तह झाला ॥ नष्ट-स्वातंत्र्य बाज़ि झाले, मुलुख मिळे आंग्लां ॥ १ ॥