पान:श्रीगोपगडमणि.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२३) सन सत्राशे चौह्यात्तरि हैं, वर्तमान घडले. ॥ चाळीसावें दिवशी माधव, पंतपदी बसले. ॥ ५ ॥ राज्य मिळावें ह्मणून दादा, इंग्रजांस नमले ॥ साष्टी, वसई, देतों बसवा, नृपासनी वदले ॥६॥ काय सांगुं सखि इ० (१६) मुंबइहूनी किटिंग साहिब, ससैन्य ये युद्धा ॥ अनय जाणुनी कलकत्तापति, परतवि बलसुद्धां ॥ १ ॥ सनसत्राशें शाहत्तरं तह, पुरंदरावरती ॥ पंतपेशवे इंग्लीशांमधिं, झाला उभयमतीं ॥ २ ॥ परंतु पुनरपि युद्ध उद्भवे, हरीपंत फडके ॥ आणि महादजि शिंदे देती, इंग्रजांस धडके ॥ ३ ॥ सन सत्राशे एकुणऐंशी, इंग्लिश परिभूत ॥ होउनि गेले स्वस्थानी करि, हरहर ! रघुनाथ ॥ ४ ॥ सन सत्राशे चौह्यांशीमधि, हताश दुश्चित्त ॥ मृत्यू पावे. कोपरगांवीं, सेवुनि एकांत ॥ ५ ॥ अधममहाधम एकचि ऐसा दुजा न नर भवनी ॥ बाजी, अप्पा, अमृतरावहि, पुत्र तया तीनी ॥ ६ ॥ काय सांगु सखि इ० (१७) हैदरअल्लीपुत्रटिपू जो, मैसुरभूप असे ॥ पंतपेशवे-लखी येउनि जनांस जाचितसे ॥१॥ पंतपेशवे, निजाम, इंग्लिश, तिघे एक झाले ॥ टिपुच्यावरती हल्ला करुनी, जर्जर त्या केलें ॥२॥ शरण येउनी टिपू करी तह, तिघां मान्य होई ॥ मुलूख चाळीस लक्षांचा मग, मराठ्यांस देई ॥ ३ ॥