पान:श्रीगोपगडमणि.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२२) पंतभानु-बाळाजी नाना,-फडणिस जनवदनीं ॥ औट शहाण्यां नरांमधीं हा, अर्धचि गे सजणी ॥ ६ ॥ काय० ॥ १४ हैदरअल्ली जैसुरनृप जो, श्रीमाधव-निकरी ॥ त्रस्त होउनी स्वस्थ बैसला, माधव विजय वरी ॥ १ ॥ सनसत्राशेबाहत्तरिं सति, गेलि रमा स्वधवा-॥ संगें थेउरगांवीं सखये, धन्य रमा सधवा ! ॥ २ ॥ पुढे पेशवे श्रीनारायण, काका पुतण्यांत ॥ द्वेष वाढला. काका नुमजे, स्वस्त्रीकलहांत ॥ ३ ॥ यास्तव बंदी काकासी कार, नारायणराव ॥ स्त्रीनादें तम लावि कुलातें, दुष्टानंदिधव ॥ ४ ॥ असत्यसाहस-माया योगें, आनंदी अधमे ॥ नीच स्त्री परि मूर्तिमंत तं, कृत्या सत्य गमे ॥ ५ ॥ काकाकाकीसंमतिने करि, मस्ती नृपसदनीं ॥ गारदिजन तो रावा दंशी, सुमेरशिंग-फणी ॥ ६ ॥ काय सांगु सखि इ० (१५) सन सत्राशे त्र्याहत्तरच्या, आगष्टी घडलें ॥ वर्तमान जणुं सखये दुःखद,-अंबर कोसळलें ! ॥ १ ॥ अधममहाधम आनंदी स्त्री गोद्विजघातकरी ।। लावि कुला अंगार एक दुजि, न पाहिली नारी ॥ २ ॥ रावस्त्री ते गंगाबाई, होती गर्भवती ।। कारभारिगण ठेवि पुरंदर, गडी तिला निगुतीं ॥ ३ ॥ ईशदये तिस पुत्र'सवाई, माधवराव धनी ॥ द्वाही गर्भश्रीमंतांची, फिरली. सकलजनीं ॥ ४ ॥