पान:श्रीगोपगडमणि.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२१) सनसत्राशें एक्सष्टामधिं, लढाइ पानपती ।। घोर जाहली शब्द ऐकतां, गर्भपतन होती ॥ १ ॥ तीत रावविश्वास सदाशिव-भाऊ मल्हार- ॥ राव दमाजी तैसे शिंदे जनकोजी शुर ॥ २॥ बुदेले गोविंदपंतही, होते सरदार ॥ शूर मराठे विरुद्ध अहमद, अफगाणेशवर ॥ ३ ॥ विश्वासराव जखमी पडले, भाउ शिरे युद्धों ॥ पुनरपि दिसला नाहीं उपजे, कशि तया बुद्धी ॥ ४ ॥ सहस्रपंचावन्न पायदळ, सहस्रपंचदश-॥ स्वार शतद्वय तोफा होत्या मृत्यु करी विवश ॥ ५ ॥ समरी झाली ठार मनुष्ये, लक्षद्वय सजणी ॥ हर ! हर ! सखये दुःखसागरी, मग्न होय अवनी ॥ ६ ॥ काय सांगुं सखि हर्ष वर्षला इ० (१३) सनसत्राशेएक्सष्टामाध, पर्वतिसत्सद्मी ॥ नानासाहिब देहार्पण करि, शंभपदपद्मी ।। १ ।। त्यास पुत्र विश्वास, रमाधव, नारायण तीन ।। पैकी अग्रज पानपती हत, प्रजा ज्यास लीन ॥ २ ॥ पुढे पेशवा रमानाथ जो, बाल्यावस्थि असे ॥ चुलता त्याचा रघुनाथ करि, कारभार सुरसें ॥ ३ ॥ मोंगलाश्रया करी आपणा, राज्य मिळायासी ॥ परी रमाधव समरों धरुनी, कैद करी त्यांसी ॥ ४ ॥ ज्ञानी निस्पृह रामशास्त्रि तो, न्यायासानं विलसे ॥ धन्य माधवें योग्यचि केलें, गुणि गुण जाणतसे ॥ ५ ॥