पान:श्रीगोपगडमणि.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२०) पैकी अग्रज नामें नाना, पंत-स्थान बसे ॥ बापूनाइकपक्षपातिनर,-रघुसंकेत फसे ॥ ३ ॥ नानाशी मग वैर मांडिलें, रघुरावें चुरसें ॥ श्रीमच्छाहू मध्यस्थी करि, तंटा मिटवि रसें ॥ ४ ॥ नानाज्ञेनें सेनानायक, झाले रघुनाथ ॥ रावसदाशिव चुलतबंधु दे, राजकार्य साथ ॥ ५ ॥ नानासाहिब-कारकीर्दै तें, पुणे राजधानी ॥ सन सत्राशेपन्नासामाध, झालें रत्नखनी ॥ ६ ॥ काय सांगुं साख हर्ष वर्षला इ० ( ११) सन सत्राशें त्रेपनसाली, कर्णाटी स्वारी ॥ . करुनी नानासाहिब खंडणि, वसूल करि सारी ॥ १ ॥ हुबळी-किल्लाशिवध्वजायुत, करि घे श्रीरंग- ॥ . पट्टणखंडणिवसूल नाना, विलसे श्रीरंग ॥ २ ॥ सनसत्राशेपंचावन्नी, गुर्जर-अजमीरीं ॥ रघुनाथाने स्वारी केली, श्रीजय त्यांस वरी॥ ३ ॥ सन अठराशे अठ्ठावन्नी, स्वारी पंजाबी ॥ करि. लाहोरी अंमल बसला, अरिस पदी दाबी ॥ ४ ॥ भाऊसाहिब निजामअल्ली, करि रण उद्गीरा ॥ मोड होउनी तोबा ! तोबा ! वदली अल्लि-गिरा ॥ ५ ॥ शरण येउनी तहामधीं दे शाहूसुत-चरणी ।। भू बासष्टां लक्षांची शतसत्रासाठ सनी ॥ ६ ॥ कायसांगु सखि हर्ष वर्षला इ० (१९)