पान:श्रीगोपगडमणि.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वारी पोर्तुगिजांवर करि शतसत्रा-सदतीस ॥ साष्टीकिल्लानिशाणि झळके, सुंदर भूपयश ॥ ४ ॥ ज्यास निजामें दिधलें होतें, साह्यवचन बाई ॥ तो दाभाडे त्रिंबक मेला, बाजिकरी दुभई ॥ ६ ॥ बाजीबंधूचिमणाजी घे, पोर्तुगिजां कडुनी ॥ सत्राशेएकोणचाळिसी, किल्ला वसइरणीं ॥ ६ ॥ काय सांगु सखि हर्ष वर्षला इ० (९) इराणनृपवर- नादिर्शाहा, दिल्लीची स्वारी ॥ बादशहातें कैदकरी दश-सहस्रजन मारी ॥ १ ॥ धनिक-जना लुटुनि सुमारे, सत्तरकोट रुपे ॥ नेई हर ! हर !! अधमनेत्रिं हा, हिंदुस्थान खुपे ! ॥२॥ तक्तनशिन करि बादशहाते, पुन्हां इराणी तो ॥ जाई; दुष्ट महाधम सखये, काळहि ज्यास भितो ॥४॥ सांप्रतकाली हिंदुस्थानी, महाराष्ट्र-राजे ॥ प्रसिद्ध शिंदेहोळकरादी, गायकवाड तिजे ॥ ४ ॥ श्रीमद्वाजीरावपेशवे-कारकिर्दि झाले ॥ सरदारत्रय उत्कर्षातें, पावति बाहुबळें ॥ ५ ॥ शिंदेकुलिं राणोजी होळकरिं, हो मल्हारमणी ॥ गायकवाडी दमाजी रूपें, त्रिमार्त हा अवनी ॥ ६ ॥ काय सांगुं सखि हर्ष वर्षला इ० (१०) नर्मदातटीं गाजी बाजी, मत्यु सखे झाला ॥ सनसत्राशेचाळिससाली, जनपद हळहळला ॥१॥ बाळाजी, रघुनाथ, जनार्दन, यवनी-समशेर ।। चार पुत्र त्या बाजीरावा, असति बहादूर ॥ २॥ .