पान:श्रीगोपगडमणि.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अनुज शहाजी भूप होय त्या पुत्राची वाणी ।। नववर्षांती राज्य इंग्रजी, करिं गेलें सजणी ॥ ६ ॥ काय सांगु सखि हर्ष वर्षला इ० (७) पेशवे. श्रीवर्धनचा जो कुळकर्णी, बाळाजी नामें ॥ कोंकणस्थ त्याप्रती धनाजी, कारकून-कामे ॥ १ ॥ सांगे. नंतर धनाजिमत्य, होतां बाळाजी ॥ अकलहुशारी पाहुनि त्यांतें, शाह नांवाजी ॥ २ ॥ सनसत्राशे चौदामधिं तो, कथिला अधिकार ॥ मुखत्यारीने राज्य करीती, तद्वंशीय-नर ॥ ३॥ सय्यदबंध मदत मागती, शाहनृपपायीं ॥ भपातेने ससैन्य युद्धा, बाळाजी जाई ॥ ४ ॥ फिरुक्शरातें ठारमारि करि, सय्यदांस विजयी । बाळाजी सरदेशमुखी घे, चौथाई बाई ॥ ५ ॥ सनसत्राशेविशी जाहला, सासवडी सजणी ।। चाळाजीचा अंत तया सुत, बाजी, चिमण गुणी ॥६॥ काय सांगुं सखि हर्ष वर्षला इ० (८) पुढे पेशवे बाजी झाले, वसूल मोकासा ॥ खानदेशि घे, स्वारि निजामी, प्रांत करी खालसा ॥१॥ दोहाप्रेषकचतुरसालनृप,-रक्षणिं दक्षासी ॥ मुलूख लक्षद्वयद मिळे शतसत्रातहतिसीं ॥२॥ बाजिस्वारी जंजीरी शत, सत्रापस्तीसी । दिल्लीप करि नमुनि तहा शतसत्राछत्तीसी ॥ ३ ॥