पान:श्रीगोपगडमणि.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धन्य, धन्य, तो शाहूराजा, रंकातें राव || रावातें ही रंक कराया, ज्याचा अनुभाव ॥ १॥ बहिरोपंता कडुनि पेशवे, पद नृप काढि तदा ॥ विश्वनाथसुतबाळाजीतें, सत्राशेचौदा ॥ २ ॥ संवत्सरि निजराष्ट्रसूत्र दे, प्रधानकरि सजणी ।। ऐषारामी मग्न घालवी विलासिं दिनरजनी ॥ ३ ॥ एक उणा त्या साडेसत्रा-शतकीं तें झाला ॥ भूपनिपुत्रिक तारानातू-रामराय बसले ॥ . नृपसिंहासनिं शूरवीर जे शिवसुतसुतज भले ॥५॥ सनसत्राशेसत्त्याहत्तरि, दुःखी हो अवनी ॥ काय सागु सखि हर्ष वर्षला इ० (६) निपुत्रिकत्वामुळे तयाच्या, सिंहासनिं राज-।।. अंकी दत्तक देउनि विलसे, शाहुमहाराज ॥१॥ अवतरला जो छत्रपती त्या, भेटे सांबाशीं ॥२॥ मागे त्यांचे सुतवर बसले, सिंहासनि सिंह-॥ सदृश शर परि दुर्विधि–पीडित, जे प्रतापसिंह ॥ ३ ॥ पंतपेशवा तयांस ठेवी, बंदी दशवर्ष ॥ मुक्त करी दे इंग्रज गादी, नृपमानसिं हर्ष ॥ ४ ॥ अठराशेएकोणचाळिसी, फितुराचा दोष ॥..... । भूपावर इंग्रेज ठेवि करि, पदभ्रष्ट त्यांस ॥ ५ ॥