पान:श्रीगोपगडमणि.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तचरितोदधि अपरंपारचि काय कयूं सजणी ॥ अल्प तोषवो समय नसे मज, रसज्ञसुजनगुणी ॥२॥ असो; शिवाजी गुडघीयोगें, सोळाशे-ऐंशी ॥ मृत्यु पावले! भूपा सोडिल, कालगती कैशी? ॥३॥ श्रीशिवनंदननृपसंभाजी, करमहाव्यसनी ॥ वधि मातासारा कलुषा, प्रधान करि अगुणी ॥ ४ ॥ नृपप्रधाना औरंगजेबें, तुलापूर-भुवनी || एकुणनव्वाद वधिले कैदी, करि तत्सुतरमणी ॥ ५ ॥ कनिष्ठबंधू-राजारामा, राज्याच्या स्थानी ॥ स्थापुनि केले सरदारें , राष्ट्रसूत्रधर जनीं ॥ ६ ॥ काय सांगु सखि हर्ष वर्षला ( ४ ). श्रीमद्राजाराम करी मग, नृपपुर सातारा ॥ निराजितनयप्रल्हादातें, प्रतिनिधि पंतवरा ॥१॥ घोरपडे सर्दार शूर जो, नामें संताजी ॥ सन्माने त्या निशाण नृप दे, जरिपटका-वाजी ॥२॥ औरंगजेबें यत्न बुडाया, महाराष्ट्र अवनी ॥ केला परि सत्राशे साती, गेला यमसदनीं ॥ ३॥ पुढे जाहला शाहूराजा, काकी करि युद्ध ॥ बंधमुक्त जो शिवसुतसुतशिव, शिववंशींशुद्ध ॥ ४ ॥ सपुत्रतारापराभूत जी, स्वतंत्र करि राज्य ॥ स्मारक कोल्हापुर अजि विलसे, महाराष्ट्रि पूज्य ॥५॥ शाहूतारासमरी स्त्रीने सुत शाहूचरणीं ॥ अर्पियला तो फतेसिंगनृप, अकलकोटभुवनीं ॥ ६ ॥ काय सांगु सखि हर्ष वर्षला इ० (५)