पान:श्रीगोपगडमणि.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

षोडशवर्षात्मकशिवमती, दंडकवान राजे ॥ तयीं पासुनी महाराष्ट्र त्या, नांव अहा साजे ॥३॥ कंक, फसल्कर, मालुसरे हे, मित्र शिवाजीचे ॥ देखुनि त्यांना थरथर कांपति, भूप विजापुरचे ॥ ४ ॥ विजापूरनप पाठवि योद्धा, शिवाजिमोडार्थ ॥ अफजुल-हिरण्यकशिपुस झाला, शिवनरहरिसार्थ ॥५॥ चाकण-तोर्णा-पुरंदरादिक, किल्ले सर अवनी ॥ स्वतंत्रसाम्राज्याचे स्थापन, करि शिववीरमणी ॥ ६ ॥ काय सांगं सखि हर्ष वर्षला इ० (२) गागाभट्टे अभिषेकोत्तर, रायगडी गादी ॥ अष्टप्रधान योजि भूप जे स्वराष्ट्र-हितवादी ॥१॥ त्यांत पेशवे, पंतअमात्याह, सचीव मंत्रि, सुमंत् ॥ न्यायाधिश, सेनापति, पंडित, प्रत्येकी पद पंत ॥२॥ श्रीशिवअंकितमुद्रा प्रसवे, टांकसाळ-गंगा ॥काल श्रीवरशिवनृपनिशाण फडके, महाराष्ट्र-रंगा ॥३॥ श्रीमत्स्वामी रामदासगुरु, समर्थ-पदपनी ॥ नम्र शिवाजी राज्य आर्प त्या, अक्षयसुखसमौ ॥ ४ ॥ विरक्त आह्मी वीर क्षत्रिय, असशी तूं पाहे ॥ गोद्विजधर्मावनी सर्वदा, परमदक्ष राहे ॥ ५ ॥ यदे स्वामि काषायवस्त्र दे, ध्वजशिखरस्थानी || विलसो राजे चंद्रसूर्य तो, अक्षयसुखदानी ॥ ६ ॥ काय सांगु सखि हर्ष वर्षला इ० (३) श्रीमत्स्वामीवरप्रदानें, तद्वंशीं गाजी | . राज्यधुरंधरभूपति झाले कमलादल राजी ॥ १॥