पान:श्रीगोपगडमणि.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मणि-काव्य मणि-काव्य. - > < -- चाल-लावणी ( जाउं नकारे विषयाटविची.) - काय सांगुं सखि हर्ष वर्षला, गालवपुर-भुवनीं । • श्रीमन्साधव नृपवर विलसे, हरिजणुं अमरगणीं ॥ धृ०॥ ईशकृपाही न्यायें केवळ, हस्तिनपुर--तख्ती || बादशहा ते हिंदुस करिती, धर्मच्युत सख्ती ॥ १ ॥ • तैमूर्लंगें नरहत्यादिक, केल्या दुष्करणी ॥ सोमनाथ करि भग्न दुष्टतम, महमूद-गिझनी ॥ २ ॥ श्रीविश्वेश्वर-काशीराजा, बंधन करूं पाहे || अलमगिरे त्या शिवालयावर, मशीद केलो हे ॥ ३ ॥ ... निगमागमातिलोप, विप्रभू, त्रस्त महा गाई ॥ होमागारी गोधव घडले, हर ! हर !! आगाई !!!॥४॥ किति सांगु सखे यवनचरित तें, इतिहासग्रंथीं ॥ पुरे, पुरे, रोमांच कंप, हे अंगावर येती ॥ ५॥ वदते गीता जेव्हां होइल, सद्धर्म-ग्लानी ॥ अवतारातें घेई भगवान्, तारक हिंदुजनीं ॥५॥ काय सांगुं सखि हर्ष वर्षला इ०- (१) श्रीशिवअंशे शहाजिउदरी, शिवाजि शिवनेरी ॥ प्रगटे हर्षित महाराष्ट्र जणुं, हरिच्या अवतारी ॥१॥ कोंडदेवसुतदादोजी दे, नृपशिक्षण राया । अश्वारोहण, धनुष्यविद्या, मल्लासमकाया ॥२॥