पान:श्रीगोपगडमणि.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१३) जास्त योजना करितात. त्यामुळे एथील दरबारच्या मराठी भाषेचा धडहिंदुना घडमुसलमान' असा प्रकार झाला आहे. श्रीछत्रपति शिवाजी महाराजांनी दरबारी फारसी शब्दांचा पंडिताकडून कोश (राज्य व्यवहार) तयार करवून, दरबारी लेखनांत फेरफार केला. तो राज्यव्यवहार कोश हल्ली प्रसिद्ध आहेच. तरी त्याजवरून येथील व्यवस्थेत फेरफार केल्यास मराठी भाषेस एकप्रकारें उत्तेजन दिल्या सारखे होईल. ह्या किल्ल्यावर नित्यशः दिवसा बारा वाजता १, व रात्री ८ वाजतां १ अशा २ तोफा सुटून जणूं त्या सुज्ञांस श्रीग्वालिपासिद्ध व सरजपाल ह्या महा विभूतींची, आणि अज्ञान्यांस ह्या प्रचंड गोपगडाची ( ग्वाल्हेर किलयाची ) आठवण करून देतात.