पान:श्रीगोपगडमणि.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आहेत. त्यांतून, इमारतीला लागणारे खांब, सरे, आढे, पाट, चौकटी, इ. सर्व प्रकारचे सामान तयार करण्याकरिता लहान मोठे दगड काढितात व दारे, खिडक्या आणि खुव्या ह्या जिनसा लांकडी केलेल्या त्या दगडी इमारतीस लावितात. येथील जयेंद्रभुवन आदिकरून : इमारती चांगल्या व पाहण्यालायक आहेत. ह्या ग्वाल्हेर प्रदेशांत, प्रसिद्ध तुकाराम एकनाथा सारखे वैराग्यज्ञानसंपन्न श्रीसर भंगनाथमहाराज,नागागोविंददास, अण्णामहाराज, मंगलमूर्ती, आबामहाराज, ढोलीबुवा, देवमहाराज इ० हिंदुसाधु; व श्रीमनसूरसाहेब, कपूरशहा, मेहेराबशा बुचेशा इ० अवलीया फकीर झाले. ह्या सर्वांचा इतिहास येथील सरकारांत लेखी असून, ह्यांच्या नांवाने चालू संस्थानांस खर्चाबद्दल सरकारांतून वर्षासने व नेमणूकाही मिळत आहेत. श्री मनसूरसाहेब अवलीयांनी श्री. महादजी महाराजांस (पाटील बुवा ) आपला प्रसाद ह्मणून भाकरी दिली होती. ती महाराजांनी आपल्या पदरांत घेऊन, घरी आल्यावर एका डब्यांत बंद करून, तो डबा आपल्या देवघरांतील देव्हाऱ्या त ठेविला, व नित्य त्याची पूजा करण्याचा प्रघात पाहिला तो अझून चालू आहे. ह्या ग्वाल्हेर प्रदेशाची भाषा हिंद. स्थानी, व हिंदी आहे. बादशाही अमलांत येथे फारशीभाषा चालत होती. हल्ली येथे ज्युडिाशयल खात्याची कामें उर्दू व फारशी भाषेत असून, मुलकीखातें मराठी भाषेत ठेविलें आहे. तथापि, मराठी लिहिण्यांत दरबारी फारशी शब्दांची