पान:श्रीगोपगडमणि.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होऊन ती मानवमनोरंजनास विशेष साह्यकारी होते; ह्या किल्ल्यावर श्रीमत् सज्जनावसंत श्रीग्वालिपासिद्धांचे मंदीर श्री सूर्यकुंडाजवळ असून श्रीची तपश्चर्येची जागा ग्वाल्हेर . दरवाजाजवळ आहे. ह्या श्रीसिद्धांस भावीक लोक श्रीगालवऋषि समजतात... ह्या. किल्लयावरील हवा स्वच्छ,शुद्ध, थंड व निरोगी आहे. त्याजवर जातां जातां. आंतल्या भागाची शोभा पाहून, ती खरोखरच सिद्धभूमि आहे असा मनुष्यास अनुभव येतो. श्रीसूर्यकुंडावर येऊन श्रीमत्वालिपासिद्धांचे मंदीर पाहतांच कसाही मनुष्य असो, तो उल्हासवृत्ति होऊन क्षणभर तल्लीन स्थितीत देहभान विसरतो. श्रीसिद्धांचे दर्शन, श्रीसूर्यकुंडस्नान, व किल्ला पाहणे, ह्यांजबद्दल सरकारांतून परवानगी घ्यावी लागत होती. परंतु हल्ली, श्री. माधवराव महाराज सा. ह्यांनी, एक आणा फी दिल्यावर पाहिजे त्या मनुष्यास, वरील गोष्टी करण्यास आंत जाऊ देण्याचा का: यदा ठरविला आहे. हा कायदा. लोकांस सोयकर असल्या, मुळे, बहुत लोक जातात. ह्या किल्लयाचे उत्तरेस प्राचीन राजधानी ग्वाल्हेर शहर हल्ली अगदी मोडकळीस येऊन, किल्ल्याचे दक्षिण बाजूस अर्वाचीन राजधानी लष्कर शहर भरभराटीस आले आहे. तथापि सरकारी कामांत 'रियासल ( स्टेट ) ग्वालियर ' असे लिहिण्याचा परिपाठ आहे. ह्या दोन्ही शहरांतील सर्व घरे दगडी आहेत. ह्या देशांत इमारती लाकडाची राने नसून, मोठमोठे दगडांचे डोंगर