पान:श्रीगोपगडमणि.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नळाने नेऊन सोडिलें. ही इमारत अद्यापिः किल्ल्यावर आहे. मानवंशांतील अखेरचा राजा विक्रमाजित हा राज्य करीत असतां, दिल्लीचा बादशहा इब्राहिम लोदी ह्याने आपला सरदार अजम हुमायून ह्यास स्वारी करून ग्वाल्हेर किल्ला घेण्याकरितां पाठविले. त्याने हल्ला करून महा प्रयासाने किल्ला घेतला, व विक्रमाजितास कैद करून बादशहाकडे नेले. बादशहाने त्यास कैदेतून सोडून शम: साबाद नांवाचा परगणा जाहगीर दिला. परमालदेवापासून विक्रमाजितापावेतों एकंदर ..१० राजे होऊन, त्यांनी सुमारे २०५ वर्षे राज्य केलें. लोदी वंशांतील पुरुष दिल्लीस बादशहा असतांना त्याजवर बाबराने काबूलांतून येऊन स्वारी केली. प्रसिद्ध रणभूमि पानिपत येथे लढाई होऊन त्यांत बादशहा व विक्रमाजित दोघे ठार मारले गेले. विजयी बाबराने रहीमदादखां नांवाचा आपला सरदार ग्वाः ल्हेर किल्ल्यावर पाठविला. पुढे काही हिंदु व कांहीं यवन सरदार दिल्लीहून किल्ल्यावर आले. पुढे विठ्ठलराव बहादूर नांवाचा मराठा किल्ला घेण्याविषयी प्रयत्न करू लागला. त्यावेळी किल्ल्यावरील व इतर आसपासचे हिंद लोकांना विठ्ठलराव ह्याचे स्वाधीन होण्यापेक्षां गोहदराणा भीमसिंग ह्याचे स्वाधीन व्हावे, हे बरें, असें जाणून, राण्यास मदतीस्तव बोलावून, त्यांनी त्याच्या साह्याने विठ्ठलरावाचा मोड केला, व किल्ला भीमसिंगास दिला. भीमसिंग वारल्यावर त्याचा पुत्र ह्या किल्ल्यावर राज्य करीत असता,