पान:श्रीगोपगडमणि.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विठ्ठलरावाने पुनः हल्ला केला, त्यांत किल्ला हस्तगत झाला नाही. तथापि, किल्ल्यावर विठ्ठलरावाचे एक ठाणे रहावें असा उभयपक्षी तह झाला. ठाणे न ठेवण्याबद्दल कुरकुर पुढे चालली होती. शेवटी, गोहदराण्याने इंग्लिशांची मदत घेऊन विठ्ठलरावाचा अगदी मोड केला, जनरल पोफाम साहेब याने युद्धांत किल्ला जिंकून तो गोहदराण्याच्या हस्तगत केला. पुढे इ. स. १७८२ साली श्रीमत्प्रतापकेसरी महादजी शिंदे यांनी गोहदराण्याशी युद्ध करून किल्ला घेतला, व अंबाजी इंगळे यास किल्ल्यावर सुभेदार नेमिलें. अंबाजी इंगळे यांनी कंपनीसरकारास किल्ला देण्याचे बाह्यात्कारें दर्शविले होते. परंतु अंतस्थ मानस देण्याचा नसून, त्याने किल्लेदारासही तसाच हुकूम दिला होता. ता. ५ फेब्रुवारी सन १८०४ इ. रोजी कंपनीसरकारांनी हल्ला करून किल्ला घेतला. सर जॉन मालकम साहेबांचे मत होते की, किल्ला शिंद्यांकडेसच रहावा. परंतु, मार्किस आफ वेलस्ली साहेबांनी गोहदराण्यास किल्ला देण्याबद्दल वचन दिले होते. त्यामुळे किल्ला शिंद्यांस न मिळतां राण्यास मिळाला. त्यावेळी श्री. दौलतराव. महाराज ह्यांना फार नाखुशी झाली. पुढे इंग्रज, व शिंदे यांत तह होऊन मालकम साहेबांमार्फत किल्ला शिंद्यांस मिळाला. तो इ. स. १८५७ पावेतो त्यांजकडेस होता. ह्याच वर्षी हिंदुस्थानांत शिपाई लोकांनी मोठे भयंकर बंड केले. त्यावेळी इंग्रजांनी काही कारणावरून किल्ला आपल्या ताब्यात ठेविला. तथापि