पान:श्रीगोपगडमणि.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बंधूंनी बादलला बक्षीस किल्याव केली. परंतु त्या वेळी आपला उद्देश न कळवितां पुढें दुसरे वेळी किल्ला आह्मांस बक्षीस द्यावा, अशी उभय बंधूंनी बादशाहाजवळ विनंति केली. त्याप्रमाणे त्याने उभय बंधंस किल्ला बक्षीस दिल्याबद्दल परवाना भरदरबारांत लिहून दिला. तो घेऊन ते किल्यावरील मुख्य अंमलदार जो सय्यद नामें होता, त्याजकडे जाऊन किल्ला मागं लागले. त्याचे मनांतून तो द्यावयाचा नव्हता.. शेवटी सय्यदास उभय बंधूंनी मेजवानी करून त्यांत ठार मारिलें, व किल्ला घेतला. ह्यांच्या वंशांत बिरमदेव, नरसिंगदेव, डोंगरसिंग, किरतसिंग, कल्याणसिंग इ० पुरुष झाल्या. वर पुढे राजा मान हा राज्य करूं लागला. याने मानमंदीर नांवाची इमारत किल्ल्यावर बांधिली. हा राजा महान् कीर्तिमान झाला. एकदां अरण्यांत फिरत असतां याने एका ठाकूराची कन्या महान् बलाढ्य पाहिली. तिने जंगली रेड्याच्या तडाक्यांत न सांपडता त्यास आपल्या पोरखेळांत शिथिलगात्र करून टाकिलें होतें. तिला मान राजाने विचारिले की, तूं इतकी बलवान कशाने झालीस ? तिने उत्तर दिले, मी रायीतलावाचे पाणी पितें ह्मणन है सामर्थ्य मला आले आहे. राजाने विचारिलें, तूं माझी स्त्री होशीलकाय ? तिनें हो झटले, परंतु, मला रायीचे पाणी पिण्यास मिळाले पाहिजे; अशी तिची अट होती. ती राजाने मान्य करून, तिजसमागमें लग्न केले. व तिला राहण्यास गुजरीमहाल नांवाची इमारत बांधून, त्यांत रायीचे पाणी