पान:श्रीगोपगडमणि.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होईल. असें जाणून, त्याने तेजकर्णास 'तुम्ही येथे येऊन राज्य करीत असल्यास आह्मी तुझांस देतो. ' ह्मणून कळविलें. तें तत्काळ त्याने मान्य करून तो जयपुराकडे पळून गेला. मूर्खच तो, पदभ्रष्ट होऊन श्वशुरगृही त्याने वास केला. सारांश, सज्जनवाणी खोटी होत नाही. जर तेजकर्णाने प्रासादिक पाल नांव रद्द केले नसते, तर खात्रीने त्याचा परिणाम असा झाला नसता. परंतु 'विनाशकाले विपरीत बुद्धिः' असो. पुढे किल्लयाचें गोपगड नांव बदलन 'ग्वाल्हेर किल्ला' नांव पडले; व त्यांवर रामदेव प्रहार नामें राजा राज्य करूं लागला. ह्याच्या वंशांत परमालदेव, सालंदेव आदिकरून एकंदर ७ पुरुष होऊन, त्यांनी सुमारे १०२ वर्षे राज्य केले. त्यांतील शेवटचा राजा परमालदेव होता. दिल्लीचा बादशाहा । शमसुदिन अल्टमष याने या राजाबरोबर लढाई केली. तीत राजाचा पराभव होऊन, किल्ला बादशाहास मिळाला: पुढे दिल्लीस अल्लाउद्दीन बादशाहा होईपर्यंत किल्ला यवनांकडे होता. अल्लाउद्दीन बादशाहाचे पदरचे सरदार परमालदेव व अधरदेव हे उभय बंधु तवर ठाकूर ज्ञातीय मोठे शूर होते. हे किल्लासंरक्षणार्थ त्याजवर राहत असत. एकदां अतिपर्जन्यवृष्टि होत असतांना परचक्र येऊन, त्यति हे जिवावर उदार होऊन लढले, व नेहमी आपल्या कामावर हाजीर असतात. असे पाहून बादशाहास मोठा आनंद झाला, व त्याने काही बक्षीस मागण्याविषयी त्यांस आज्ञा