पान:श्रीगोपगडमणि.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होता. ह्मणजे संसारांत दिसणारें खौख्य खरें, व स्वर्गसुख मिथ्या असे त्याचे मत होते. त्यास कोणी असे सांगितले की, श्रीग्वालिपासिद्धांच्या कृपाप्रसादानें तुमचा पूर्वज शरसेन यास राज्यपद मिळून, सरजपाल हे नांव ठेविले गेले. तो नास्तिक असल्यामुळे त्यास ही गोष्ट मिथ्या वाटली, व त्याने त्या नांवाविषयीं तिरस्कार दर्शविला. इतकेच नव्हे तर, त्या अविचाऱ्याने उन्मत्त होऊन, भरदरबारांत प्रासादिक पाल नांव रद्द करून, आपणास तेजकर्ण नांव ठेवून घेतलें, व 'तेजकर्ण महाराज' या नावाने कागदोपत्री लिहिण्याचा मांडलिक लोकांकडे हुकम जारी केला; त्यावरून तो सर्वांच्या मनांतून अगदी उतरला. परंतु काय करितात बिचारे! सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. त्या दिवसापासून त्याच्या ऐश्वर्याचा पायाच खचला. थोडक्याच वर्षांत त्याजवर अनेक प्रबल शत्रू चालन येऊन, त्यांनी त्यास अगदी जर्जर करून सोडिलें, व प्रत्येक लढाईत त्याचा पराभव होत गेल्यामुळे, अखेर अखेर 'दे माय धरणीठाय' असें । त्यास झालें. तेजकर्णास जयपूरच्या राजाने आपली कन्या दिली होती. जयपूरच्या राजास पुत्र नव्हता. त्यावेळी जामाताची झालेली दुर्दशा सासऱ्यास कळून, त्याने विचार केला की, आता आपण जावयास आश्रय न द्यावा तर कन्येची अतिदुर्दशा होणार. नवऱ्यामागे पळता पळता महान् विटंबना तिला भोगावी लागेल, व आपणास मुल. माही नाही. तरी जावयास आश्रय देण्यांत सर्व ठीक