पान:श्रीगोपगडमणि.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धातूचे तुकडे बाहेर काढिले. ते पाहून त्यास-विस्मय झाला. परंतु विचार केला की, प्रथम कुंडांत स्नान केले त्यावेळी रोग परिहार न होता, केवळ सिद्धांच्या कृपाप्रसादानेच तो झाला. तरी ह्यांच्या कृपाप्रसादानेच किल्ला बांधिला जाईल, यांत संशय नाही. नंतर त्या जिनसा बटव्यांत घालून त्याने तो कमरेस बांधिला; व सिद्धांस साष्टांग नमस्कार घातला. तेव्हां सिद्धांनी त्याच्या मस्तकावर हस्त ठेवून, त्यास 'सूरजपाल' या नावाने हांक मारिली. नंतर सिद्ध गुप्त झाले, ते पुनः त्यास दिसले नाहीत. शूरसेन हर्षित होऊन, सज्जनलीलेचें आश्चर्य करीत करीत मंडळीसह गांवी आला, व त्याने आपले सरजपाल नांव चालू केले. पुढे काही कालाने सिद्धांच्या कृपाप्रसादें त्याने आसपासचे ठाकर लोकांस जिंकन, तो त्यांचा राजा झाला. भगवंताची वाणी खोटी होते, परंत सजनवाणी कधीही खोटी होत नाही. असो. सरजपालाने सिद्धाज्ञेप्रमाणे सूर्यकुंड विस्तृत करून, पक्कें मजबूत चिरेबंदी बांधून, गोपाचलावर किल्लाही बांधिला. या किल्लयास गोपगड नांव ठेवून, त्याचे खाली नजीकच ग्वाल्हेर शहर गोपालीयपुर | वसविले. पुढे ३६ वर्षे या किल्ल्यावर राज्य केल्यावर तो मरण पावला. त्याच्या वंशांत रसिकपाल, नरह. रपाल, अमरपाल आदिकरून ८३ पुरुषांनी एकंदर. ९८९. वर्षे राज्य केलें. या शेवटच्या बुधपालाचा मुलगा तेजपाल हा गर्विष्ठ असून, ईश्वर, साधुसंत व स्वधर्म इ. गोष्टींविषयी फार नास्तिक