पान:श्रीगोपगडमणि.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

की, येत्या रविवारी तुम्ही याच कुंडांत स्नान करावे लणजे कुष्ट परिहार होईल. त्यावर ठाकूराने सिद्धांस साष्टांग नमस्कार घातला. नंतर त्यांची आज्ञा घेऊन तो घरों आला. सिद्धाज्ञेप्रमाणे पुढील रविवारी ठाकूर सहकुटुंब सहपरिवार गोपाचलावर येऊन कुंडांत स्नान करून कुष्टविरहित स्वदेहातें पाहता झाला. मग काय सांगावें? हर्षयुक्त होऊन सिद्धांच्या चरणी रममाण झाला. व त्याने बहुत दानधर्म केला. तो घरी जाण्याबद्दल निरोप मागू लागला. तेव्हां सिद्धांनी त्यास आज्ञा केली की, ज्या कुंडांतील उदकाने रोग परिहार होऊन तुमची काया शुद्ध झाली, ते कुंड विस्तृत करून पक्के बांधून ह्या गोपाचलावर किल्ला बांधा, व आपल्या कुलास पाल हे नांव ठेवा, हे नांव तुमच्या वंशजांनी पुढे चालविल्यास ते ह्या गोपाचलावर राज्य करितील. जर उन्मत्त होऊन पाल नांवाचा तिरस्कार करून त्यांनी दुसरें नांव घेतले; तर ते तत्काल राज्यभ्रष्ट होतील. हे श्रवण करून ठाकराने विनंती केली की, महाराज मी एका गांवचा जमीदार असोन द्रव्याभावामुळे किल्ला बांधण्यास असमर्थ आहे. हे ऐकुन सिद्धांनी आपले जवळचा एक बटवा त्यास दिला, व येणेकरून तुझी कार्यसिद्धि होईल, असे ते झणाले. त्यावेळी, ह्या बटव्यांत अशा अमूल्य जिनसा काय आहेत ? की जेणेकरून मी किल्ला बांधण्यास समर्थ होईन, त्या पाहण्याची ठाकुरास अति उ. त्कंठा होऊन, त्याने बटवा उघडून त्यांतून गारगोव्या व