पान:श्रीगोपगडमणि.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाही. कारण जर हे क्रूर असते, तर एव्हांपावेतो असे स्थिर न राहता माझ्या अंगावर चालून येऊन त्यांनी माझा खरोखर घात केला असता; असा तर्क त्याने बांधिला. शेवटी में होणे असेल ते होईल, ह्या साधूचे चरणीं लोटांगण घालावे ह्मणजे सर्व संकटें दूर होतील असा दृढ निश्चय करून शूरसेन सिद्धाचे चरणी दंडासारखा पडला. तेव्हां सिद्धांनी त्यास विचारिलें कीं, तूं कोण आहेस? व येथें कां. आलास ? त्यावर ठाकूराने आपले नांव, गांव वगैरे सांगून, मी तृषाक्रांत आहे, तरी उदक मिळावे, अशी विनंति केली. श्री सिद्धांनी आपले जवळचा जाड रुमाल त्याच्या हाती देऊन, आज्ञा केली की, ह्या झाडीतील झांत (सूर्यकुंडांत) स्नान करून, रुमालांत पाणी आणावें; त्याप्रमाणे ठाकूर कुंडांत स्नान करून व रुमालांत पाणी भरून सिद्धाजवळ आला, व त्याने रुमाल सिद्धांच्या हाती दिला. त्यांतील थोडेसें जल अधर (रुमाल. तोंडास न. लावितां) प्राशन करून शेष जल सिद्धांनी ठाकरासः पिण्यास दिले. ते त्याने प्राशन केले. त्यावेळी सिद्धांची दृष्टि त्याच्या उघड्या शरीरावर पोंचून रोगाविषयी त्यास पृच्छा केली. त्यावर ठाकुराने विनंति केली की, मला दोन वर्षांपासून हा कुष्टरोग उद्भवला. यास पुष्कळ उपचार केले; परंतु दुर्दैवामुळे दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. हे ऐकून सिद्धांस फार वाईट वाटले. 'सन्मन लोण्याहून मऊ' हे काक्य खोटें नाहीं, असो. सिद्धांनी त्यास आज्ञा केली