पान:श्रीएकनाथ.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. त्या पुण्याच्या जोराने याचा हा महारोग नाहीसा होवो. (पाणी त्याच्या हातावर सोडतो.) ब्राह्मण-( मोठ्या आनंदानें ) महाराज माझ्या शरीरांत ज्या वेदना होत होत्या, त्या आतां एकदम नष्ट झाल्या. मला मोठे समाधान वाटत आहे. माझ्या हातापायांची बोटें आतां ताठ होतात. मला चांगले दिसूं लागले. ऐकू येऊ लागले. माझ्या तोंडास चव आली. आतां मला पांच कोस चालण्याची शक्ति आली. माझी प्रकृती: उत्तम झाली. मी आपला काय उतराई होऊ ! एकनाथ-पांडुरंगाचे नामस्मरण करीत जा, ह्मणजे आमांस सगळे पोहोंचलें. ज्याला कथा ऐकवत नाही किंवा ज्याला स्वताही करतां येत नाही, त्यांनी नेहमी नामस्मरण करावें. राम, कृष्ण, गोविंद, विठ्ठल अशी नाममाला जर जपली तर सर्व तीर्थ त्याला लोटांगणे घालीत येतील. तेहतीस कोटी देव त्याच्या पायाचे दास होतील. त्याचे चरणरज आपल्या कपाळी लागावे ह्मणून यम लाळ घोटील. शंख, चक्र, गदा, पद्म हस्तांत धारण करून भगवान् त्याच्या दारांत, “ मला काही तरी काम सांगेल काय ? " अशी वाट पाहत उभा राहील. जगांत असें पापच नाही की, ज्याची शक्ति नामापुढे टिकाव धरील. अभंग. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी ॥ चित्त नाहीं नामी । तरि तें व्यर्थ ॥१॥ नामासि विन्मुख तो नर पापीया ॥ हरिविण धांवया नपवे कोण्ही ॥ २॥ पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मीक ॥ नामें तिन्ही लोक उद्धरती ॥३॥ ज्ञानदेव ह्मणे नाम जपे हरीचें ॥ परंपरा त्याचे कुळ शुद्ध ॥४॥ अभंग. हरि बोला देतां हरि बोला घेतां ॥ हसतां खेळतां हरि बोला ॥१॥ हरि बोला गातां हरि बोला खातां ॥ सर्व कार्य करितां हरि बोला ॥२॥ हरि बोला एकांती हरि बोला लोकांतीं ॥ देहत्यागा-अंती हरि बोला ॥३॥ हरि बोला भां