पान:श्रीएकनाथ.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. डतां हरि बोला कांडतां ॥ उठतां बैसतां हरि बोला ॥४॥ हरि बोला जनी हरि बोला विजनीं ॥ एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥ ब्रिाम्हण नमस्कार करून जातो. श्रीखंड्या खडावा, धौतवस्त्रे व कावंड घेऊन प्रवेश करितो.) श्रीखंड्या-आज महाराजांच्या मनांत कांही तरी विचार घोळतो आहे. एकनाथ-तूरे कशावरून जाणिलेंस ? तूं तरी मोठा धूर्तच आहेस. मला त्या राण्यामहाराच्या घरी आज भोजनास जावयाचें आहे. तेव्हा माझ्या मनात विचार चालला आहे की, घरी जाऊन नंतर जावें, किंवा असेंच परभारे त्याच्या घरी जाऊन द्वादशी सोडावी? श्रीखंड्या-आपण आपल्या घरी जावें. राण्याचा भाव पांडुरंगाच्याठायीं जर निर्मळ असला, तर तो परभारे आपल्या रूपाने जाईल. महाराच्या घरी भोजन करण्याची त्याला संवय आहे.. चोखामेळ्याच्या घरी दहीभात खाण्याची त्याला संवय आहे. नुसतें आपल्या मनांत असे आले की, पांडुरंगाने आपल्या रूपाने जावे की, तो गेलाच म्हणून समजा. आज आपण काय मौज होते ती बघू.. आतां आपण आपल्या घरीच जाऊं. आलाच आपल्याला महार बोलावणे, तर मुशाल जावें. न आला तर पांडुरंगानें खटल्याचे निवारण परभारें केलें, आपल्यास तोशीस लागं दिली नाही, अस समजावें. एकनाथ-बरें तर तूं ह्मणतोस तसेंच करावयाचें. श्रीखंड्या-आपल्यास संध्या करावयाची आहेना! एकनाथ:झालि संध्या, संदेह माझा गेला ॥ आत्माराम हृदयीं सेजे आला ॥ध्रु०॥ गुरुकृपा निर्मळ भागीरथी ॥ शांति क्षमा -यमुना सरस्वती॥