पान:श्रीएकनाथ.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२ श्रीएकनाथ. याला पकडं. नंतर याला कायमचा बहिष्कार घालूं. आपल्यापैकी कांहीजणांनी याच्या घरी राहावें. काहीजणांनी त्या महाराचे घरा चे आजूबाजूला लपून बसावें. चला आतां मुकाट्याने. (ब्राह्मण जातात. एक गलित कुष्ट भरलेला ब्राह्मण प्रवेश करितो.) ब्राह्मण-(एकनाथाच्या पायां पडून ) महाराज, मी फार अनाथ आहे. अपराधी आहे. कर्महीन आहे. मतिमंद आहे. परद्रव्य-परस्त्री अभिलाष करून संसारांत अनेक दुःखें भोगिली. अनेक घोर कमज्यांचा तोंडावाटे उच्चार सुद्धा करूं नये अशी माझ्या हातून घडली. या पापाने मी गलित कुष्टानें व्याधिग्रस्त झालो आहे. सर्वांगाची दुर्गधी येते. कानाने ऐकू येत नाही. डोळ्यांनी धड दिसत नाही. बारा वर्षे त्र्यंबकेश्वरीं अनुष्ठाने केली. कंदमुळे भक्षण केली. शेवटी श्रीने दृष्टांत दिला की, प्रतिष्ठानी श्री एकनाथमहाराज मोठा वैष्णव भक्त आहे. ब्राह्मणाची सेवा करितो, सर्व भूतीं समभाव धरितो, त्याच्या पदरी एक मोठे पुण्य जोडलेले आहे. तापलेल्या नदीच्या वाळूत एक महाराचे पोर भाजून तडफडत असतां इतर ब्राह्मणांला त्याची दया आली नाही, आपल्या पोटांत दया उत्पन्न होऊन आ पण मोठ्या कळवळ्याने ते बालक त्याच्या आईकडे पोंचतें केलें. हे महापुण्य आपण जोडिले आहे. त्याचे उदक जर आपण माझ्या हातावर घातले, तर माझें कुष्ट ताबडतोब जाईल. एकनाथ-(हंसून ) मला पामराला एवढा मान कशाला पाहिजे ! आपण रोगाने फार पीडित आहांत. आजन्मपावेतों जे पुण्य या जीवाकडून झाले असेल, ते सर्व पाहिजे असल्यास आपल्यास अर्पण करितों. ब्राह्मण-महाराज, एवढे पुण्य मला घेण्याचा अधिकार नाही. मला पचणार नाही. श्री व्यंबकेश्वराने जी मला आज्ञा केली आहे तेवढेच मला द्यावें. एकनाथ-(गंगेत बुडी मारून हातांत पाणी घेऊन ) माझ्या हातून महाराचे पोर त्याच्या मातेकडे पोहचते केल्याचे पुण्य जर घडलें असेल, तर मी ते मोठ्या आनंदाने या ब्राह्मणाला अर्पण करितो.