पान:श्रीएकनाथ.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. अचिंत्यरे भाई, अचिंत्यरे भाई ॥ ब्रह्मस्फुरे, तेचि माया॥३॥ नाम नही तहा, रूप न रेखा॥ सोभयी हमारी काया, बाबा॥४॥ नाहं वेदा, नाहं सिद्धः ॥ नाहं पंडित, ग्यानी बाबा ॥ ५॥ नाहं जपी, नाहं तपी ॥ नाहं देह ध्यानी बाबा ॥६॥ नाहं पुरुषः, नाहं नारी ॥ नाहं देही, ना विदेही ॥ ७ ॥ नाहं पिंडा, नाहं ब्रह्मांडा॥नाहं मौनी, नाहं विचारी बाबा ८ नाहं सद्रुप, नाहं चिद्रुप ॥ नाहं आनंद, नाहं भोग ॥ ९॥ जनार्दनकापूता, अभिनव एका॥निर्विकल्प, सर्वांगी बाबा १० ( हात जोडून नम्रतेने ) राण्या महार मोठा वैष्णव भक्त आहे. हरिभजनीं रत झाला आहे. पड्रिपु जिंकलेले आहेत. मग त्याला अंत्यज कसा ह्मणावा ? अनामिकाचे एक सुद्धा लक्षण त्याच्या अंगी दिसत नाही. जेवढे भागवत धर्म आहेत ते सर्व त्याच्या अंगी बाणलेले दिसत आहेत. चित्ताची तळमळ जाऊन मनाला शांतता आलेली आहे. त्याने आपल्या भक्तीने पांडुरंग आपलासा केलेला आहे. कामक्रोध-लोभ-माया ही त्याच्या शरीराला स्पर्श करीत नाहीत. त्याची निष्ठा पाहून किंचित् श्लोकाचे अर्ध बोललों त्याची मला क्षमा । करा. आपण मला जनार्दनस्वरूपी आहात. आपल्या वचनमात्रेकरून स्वाहा स्वधा जेव्हां होतात, तेव्हां इंद्रादि देवता तृप्त होतात. आपल्या भाषणेकरून पाषाणमूर्तीत देव प्रकट होतो. भगवान् आपला लत्ताप्रहर श्रीवत्सभूषण ह्मणून आपल्या हृदयीं धारण करितात. आपण प्रतिसृष्टि निर्माण करणारे, समुद्राचे घोट भरणारे, भगवान् सूर्यनारायणाचें तपन करण्याचे काम आपल्या छाटीकडून करणारे, शेषाचें पृथ्वी उचलण्याचे काम आपल्या दंडाकडून घेणारे, असे आपण प्रत्यक्ष धरामर आहांत. आपल्यास हवे तर आपण खुशाल वाटेल तें प्रायश्चित्त या देहास द्या. पण मला प्रायश्चित्ताची जरूरी मुळीच दिसत नाही. आपण ब्राह्मण, आपल्याला क्रोध नसावा. धर्माधिकारी-फाजील, वाचाळ, काही तरी लाघवी भाषण करतो. ( इतर ब्राह्मणांस एका बाजूस काढून ) आतां आपण याच्या पाळतीवर राहून हा त्या राण्या महाराचे घरी भोजन करीत असतां