पान:श्रीएकनाथ.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. एकनाथ-महार आणखी ब्राम्हण हे उभयतां रुष्णस्वरूपांत समरस झाले होते, म्हणजे एकत्रच होते. THESE राण्या -अस जर होत तर मी म्हनतो मी आन आपुन जर एकच होतो, तर आज माझ्या गरीबाच्या झोपडीपोत चालुनशान में माझ्या बायकोच्या हातची वाईच भाजीभाकर खानात ? माझ्या बा. यकोन लयी छंद घेतला आहे तुमच्या जेवन्याचा मनुनशान मनतो. ___एकनाथ-श्रीजनार्दनरुपेकरून तुझे मनोरथ पूर्ण होतील. देवाचे घरी भक्ति पाहिजे, ती तुझ्या अंगी आहे. देवाच्या घरी बाम्हण आणि अबाम्हण असा भेदाभेद नाही. भक्त आणि अभक्त असा मात्र आहे. बाम्हण वेदशास्त्रांत निपुण आहे पण हरिभक्तीला विन्मुख आहे; आणखी जातीचा अंत्यज म्हणजे महार पण खरा भक्त आहे, तर तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे. यास आधार भागवत ग्रंथीं असा आहे की, विप्राद्विषणयुतादरविंदनाभपादारविंदविमुखा श्वपचं वरिष्ठं. ( एकनाथास धर्माधिकारी हाताला धरून ओढतात. राण्या जातो.) धर्माधिकारी--अरे मूर्खा, भागवत नव्हे केवळ श्रुति, त्यांतला लोक तूं महारास सांगतोस ! जे ऐकण्याचा महारास अधिकार नाही ते सिद्धांतज्ञान अनामिकास सांगतोस ! अनुचित कर्म करितोस ! . तू आहेस तरी कोण ? विश्वेश्वर-कुत्र्यापुढे क्षिप्रा नेऊन ठेवितोस ! गाढवाला उंची Te ती अनी कासनीश ! तूं आहेस तरी कोण ? गावर महा दोषाचे खापर फुटले आहे. N बाम्हणांला श्राद्धाचे क्षण देतोस, आणखी फकीरांना गिळायला तोस ! तूं आहेस तरी कोण! त्रिविक्रम०-भागवताचें पुस्तक प्राकृतांत करण्याचा अधिकार तुला काय ? तूं कोण आहेस ? धरणीधर०-महाराचे आमंत्रण घेतोस ! तं कोण आहेस ! एकनाथ--मी होय ? कोण आहे तें लक्ष देऊन ऐका, अभंग. नाहं जोगी, नाहं भोगी ॥ नाहं दिगंबर, ना सन्यासी ॥१॥ नाहं कर्मी, नाहं धर्मी । नाहं उदासी, ना घरवासी बाबा ॥२॥