पान:श्रीएकनाथ.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. , । त्रिविक्रमपंडित-अहो, आपण पंडित व वैदिक, शास्त्री, पुराणीक, धर्माधिकारी सर्वांची त्याने अप्रतिष्ठा मांडली आहे. आमाला कोणी पुसत नाहीं प्रारुत विद्येचें अध्ययन असून घरी धनधान्य विपूल येते. द्रव्य पुष्कळ येते. ह्मणे अयाचितवृत्ति, रोज शेकडों ब्राह्मण जेवतात ! पण काही कमी नाही. नुसता लाट मारतो. तो श्रीखंड्या ब्राह्मण पाणी आणण्याला, स्वयंपाक करण्याला, वाढण्याला, हरएक काम करण्याला, खुप खंबीर आणि बिनपगारी मिळाला आहे. कसें धरणीधरशास्त्री ? पिया- (वाळूत गडबडा लोळतो. ) अग बया बया, मेलों मेलों मेलों ! ! ! धरणीधरशास्त्री-अहो, आह्मीं सर्व शास्त्रांत निपुण पण आझाला आतां पोटाकरितां लोकांची खुशामत करावी लागते. लोक ह्मणतात, एकनाथ विष्णूचा अवतार ! पण मी ह्मणतों आमचा दावेदार ! सगळे आमचे यजमान जे आहेत ते प्रारुत ग्रंथ वाचावयास - लागले आणि ऐकावयाला लागले. आतां काय करावें तरी काय ! अहो, यजमानाचे असो, पण आह्मां भिक्षुकांच्या बायका त्या देखील ह्मणावयाला लागल्या की, संसौर मिथ्या भ्रम आहे. त्याच्या घरी जाऊन त्या नाथाच्या पायां पडतात. द्वापारयुगांत जसे श्रीकृष्णाकरितां ऋषिपत्न्यांनी नवऱ्याला चोरून अन्न नेले, तसे आमच्या बायका आह्मांला चोरून एकनाथाच्या कीर्तनाला जातात. ( रागाऊन ) हा आमची मिळकत सर्व प्रकारे बुडविण्याला कारणीभूत झाला. आहे. याच्या संगतीने सगळे पैठण सिद्धांतज्ञानी बनत चालले आहे.. धर्माधिकारी-राण्या महार मणजे सगळ्या गांवचा चोर. त्याला याने आश्रय दिला. आश्रय दिला इतकेच नाही, पण मागेझाले त्याला पुष्कळ दिवस-आपल्या बायकोच्या हाताने कणेरी करून त्याला पाजिली. एकनाथाने आपल्या हाताने त्याला खावयास घातली. अशी पक्की बातमी मला लागली होती. तो महार आतां मोठा साधु बनला आहे. नेहमी विट्ठलनाम तोंडांतून काढीत असतो.