पान:श्रीएकनाथ.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. प्रवेश ३ रा. जीत स्थळ-गंगानदीचे वाळवंट.. (धर्माधिकारी व इतर ब्राह्मणमंडळी एकनाथाच्या कुटाळ्या करीत बसली आहेत. एक महाराचे पोर उन्हाने वाळूत तडफडत आहे.) धर्माधिकारी-आमच्या पैठणांत भागवत धर्माचे हे एक दुकानच घातले आहे ह्मणावयाचें. वक्तृत्वांत झणजे मोठा बाणेकरी आहे असे मला काही वाटत नाही. परंतु कीर्तनाच्या योगाने मात्र लोकांची मनें आपलीशी करून घेण्याविषयी अगदी हातखंडा काम आहे. गीर्वाण भाषेचा कैवार घेण्याचे टाकून प्राकृत भाषेवर चवऱ्या ढाळतो. शेंकडों संस्कृत पुराणे आहेत, पण सगळ्यांना फाटा देऊन याने भागवत निवडून काढिले. भागवत ऐकून आतां लोक आपली कामनीक व्रतेसुद्धा कोणी आचरीतनासे झाले. कसें, विश्वेश्वर भटजी! पिया-( वाळूत गडबडा लोळतो. ) अग बया बया, मेलों मेलों मेलों !!! विश्वेश्वरभटजी-अहो काय सांगावें, आमचे यजमानाचे जिवावर आमचा प्रपंच चांगला थाटाने चालत होता. पण आतां आमचे सगळे यजमान त्या भागवताचे नादी लागून कांहीं व्रतवैकल्यें करीतनासे झाले. काय करावें हो सोमनाथशास्त्री ? पिय- ( वाळूत गडबडा लोळतो. ) अग बया बया, मेलों मेलों मेलों ! !! सोमनाथशास्त्री-भागवत ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी आणि भागवत याशिवाय त्याला ग्रंथ नाही. ज्याच्या त्याच्या तोंडी तरी हेचः ज्ञानेश्वरी आणि भागवत, भागवत आणि ज्ञानेश्वरी. याचे पुराण ऐकून ऐकून सगळे लोक ईश्वरच होऊन जातील. मग बिचारा खरा इश्वर काय करील कोण जाणे. याचीच मला काळजी वाटावयास ५ लागली आहे. कसें त्रिविक्रमपंडित ! पिया- ( वाळूत गडबडा लोळतो. ) अग बया बया, मेलों मला मेलों !!!