पान:श्रीएकनाथ.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. एकनाथ हा धर्मबाह्य कामें फार करितो, ह्याबद्दल मी त्याला प्रायः श्चित्त देणार आहे. पिया-(वाळूत गडबडा लोळतो.) अग बया बया, मेलों मेलों मेलों ! ! ! विश्वेश्वरभटजी-हेच तुझी चुकतां. त्याला प्रायश्चित्त देऊन शुद्ध करून घेण्याचे कारणच नाही. कसें म्हणाल तर केलेल्या रुतीबद्दल त्याच्या मनाला काडीभरसुद्धां पश्यात्ताप नाही. पुनः अर्से करणार नाही, असेही तो म्हणत नाही. मग तुमच्या प्रायश्चित्ताचा उपयोग काय? पिया--(वाळूत गडबडा लोळतो.) अग बया बया, मेलों मेलों मेलों ! ! ! सोमनाथ हे कोणाचें कारटें आहे हो ? मघापासून उगाच शंख करीत आहे. बरे ते असो. तुम्हांला समजत नाही. आज कसा झाला तरी त्याचा चालता काळ आहे. आपणांस नेहमी भोजनास जावयास सांपडते. त्याला जर कायमचा बहिष्कार घातला, तर त्याच्या घरी ब्राह्मणांस व ब्राह्मणेतरांस नित्य मुक्तद्वार आहे, त्याची वाट काय ? आपल्याला तरी रोज त्याच्या घरी घृतकुल्या मधुकुल्या यथेच्छ हात मारण्यास सांपडणार कसा ! याचा विचार केला पाहिजे. पिया-(पाडूंत तडफडतो.) अग बया बया बया, मेलों मेलो मेलों ! ! ! त्रिविक्रम-त्या दिवशी प्रत्यक्ष त्याचा आजोबा चक्रपाणि याचें श्राद्ध. आह्मांला क्षण दिलेला. पण नदीवरून नित्याचे आन्हिक उरकून येण्यास आम्हांस किंचित् उशीर मात्र लागला, तो स्वारीने तीन फकीरांस आमच्या अगोदर भोजनास घालून स्वारी मोकळी झाली. आजाआजी वारली त्याबद्दल बिचाऱ्याला काडीचेसुद्धा दुःख नाहीं ! म्हणतो जन्म आणि मृत्यु आहेत कोठे ? बरोबरच आहे. . आजोबाचे आणि यांचे मोठे सूतच होते की नाही ! बाळ्या पहिल्यापासून नशीबाचा धड ! जन्माला आल्याबरोबर आईबापाचा