पान:श्रीएकनाथ.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. राण्या-बाई, तूं आमची वडील बहीन हैस. आमची पांच भावांची ववाळणी तुला काय द्यावी ! आतां आझी पांचजन तुला आनखी तुझ्या नवऱ्याला दंडवत घालतों. (दंडवत घालतात. एकनाथ व त्याची बायको उलट पायां पडतात. चोर जातात. श्रीखंड्या कावड घेऊन प्रवेश करतो. नमस्कार करतो.) श्रीखंड्या-आपण नेहमीं श्रीविठ्ठलाची सेवा करितां, ब्राह्मणाची सेवा करितां, सर्व भूतमात्री समता धरितां, आपपर भेदाभेद पहात नाही, हे पाहून माझ्या चित्तांत आपली सेवा या हस्ते कांहीं तरी घडावी ह्मणून मी लांबून आलो आहे. जन्मापासून मी आपल्यासारख्या संतांचें दास्यत्वच करीत आलों आहे. संतांचे दा मी एकनिष्ठपणाने आणखी फार उल्हासाने करितों. मला कांहीं । नको, कांहीं नको. तुमच्या घरचे अन्न तुमचा प्रसाद ह्मणून पोट खावयाला मिळाले झणजे बस्स. एखादें जाडेभरडे वस्त्रप्रावरण-केवळ । निर्वाह होण्यापुरते मिळालें, झणजे मला तें बहुत मोलाची शालजोडी किंवा पीतांबरच मिळाला असे समजेन. 2 come - एकनाथ–तुमचे राहण्याचे ठिकाण कोणते ? तुमच्या कुटुंबांत कोणकोण माणसें आहेत ? तुझी कोणत्या शाखेचे ब्राम्हण ? तुमचे नाव काय ! Ashopkeagenction श्रीखंड्या-महाराज मला कोणी नाही. आई नाही. बाप नाही. पाठी नाही. पोटी नाही. माझा मी या जगांत एकटा. बायको,सद्धां हडदें नाही. जसा परमेश्वर एकटा तसाच मी एकटा. या देहाला रुण्ण श्रीखंड्या ह्मणतात. मी सर्व देश हिंडत असतो. मला जेथें प्रशस्त वाटेल त्या ठिकाणी राहतो. मी ऋग्वेदी ब्राम्हण आहे. तुमची सेवा करावी या हेतूने आलो आहे. एकनाथ—( हंसून ) सेवा करण्याचे काही कारण नाही. आपण खुशाल आमच्या घरी भोजन करून रहावें. श्रीखंड्या-स्वकष्टार्जित अन्न मिळवा ह्मणजे तें खाण्यास प्रशस्त असते. तशांतून मी चांगला धट्टाकट्टा आहे. काही तरी परोपकार करीत असावा. जातो. गंगेचे पाणी कावडीने भरतों. (जातो.)