पान:श्रीएकनाथ.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. जे रगत वाहत होत, तेबी बंद पडल. पहिल्यागत मी अगदी हुशार झालों, आतां मी या पायाचा रातंदिस चाकुर हय. नेहमी देवाच • नांव घेत जाईन, 1 एकनाथ-असें केलेंस तर मी तुला आपल्या पाठच्या भावाकप्रमाणे समजत जाईन. तं महार आणि मी ब्राम्हण हा भेदाभेद * माझ्या मनांत नाही. परमेश्वराच्या घरी आपण उभयतां एकच आहों. समुद्राला जोपावेतों नद्या, ओढे किंवा ओहोळ मिळाले नाहीत तोपावेतों लोक त्यांना निरनिराळी नांवे देतात. परंतु एकदां समइद्रांत मिळाल्यानंतर त्यांचा एकच महासागर होतो. तसें ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र या चार जाति कोठपावेतों ? जोपावेतो त्या ईश्वराच्या भक्तिरूपी नावेत बसल्या नाहीत तोपावेतो. याची उदा सहरणे, चोखा मेळा महार, सजन कसई, रोहिदास चांभार, गोरा कंभार. कबीर कमाल, वगैरे शेंकडों देतां येतील. ( कोतवालचा शिपाई प्रवेश करितो.) शिपाई–महाराज, मी या राण्या महाराला पकडून नेण्याकरितां आलो आहे. तसेच याचे हे साथीदार यांनाही चावडीवर घेऊ. न जाणार आहे. या राण्या महाराने आजपावेतों शेंकडों वेळा चोऱ्या करून लोकांची घरे लुटली आहेत. याला कोतवालाकडून चांगली शिक्षा मिळाली पाहिजे. एकनाथ-याने केलेल्या अपराधाबद्दल मला आज पूर्ण पश्या त्ताप वाटत आहे असें तो ह्मणतो. कोतवालसाहेबाला माझी विनंति अशी जाऊन सांग की, शिक्षेचा मुख्य उद्देश हाच की, पुनः गुन्हा होऊ नये. हे जर आहे तर राण्या महार पुनः गुन्हा करणार नाही. याला मी जामीन आहे. इतक्यावर त्यांची मर्जी. या सर्व चोरांना शिक्षा करावी अशी असल्यास त्यांना विचारून येऊन यांना घेऊन जा. शिपाई-महाराज, आपली रुपा त्यांच्यावर झाली. आतां ते जन्मांत चोरी करणार नाहीत. मी कोतवालसाहेबास आपला हेत समजाऊन सांगतो. (जातो.) गिरजा-झटले हे आपल्या घरी पाहुणे आले आहेत. तेव्हां या सर्वांनी आपल्या घरी जेऊन जावे असे मला वाटते.