पान:श्रीएकनाथ.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. आह्मी आंधळ झालो. आन खरोखरच आह्मी तिला नदीवर घेऊन गेलो असतो, तर आमच मुडदच वळल असत. नाइतर जळूनशान आमची राख झाली असती. एकनाथ-पाहूं तुमच्या डोळ्यांना काय झाले आहे ते ! गुरुमहाराज, हे गरीब बिचारे एकाएकी अंधळे झाले. हे आपल्या पायाचे दास आहेत. रूपा करून यांना दिसूं द्या. यांचे जर डोळे गेले, तर यांनीं । आपला चरितार्थ कसा चालवावा ? गुरुमहाराज यांच्यावर आपण रुपा . करावी. ( चौघांच्या डोळ्यांवर हात फिरवितो. ) आतां कसे काय ? गेन्या-महाराज पहिल्यापरमान नामी दिसाया लागल. आन ह्यानाबी समंद्याना दिसाया लागल. तुमच उपकार आमच्या डोईवर लइ झाल. ते आझी कस फेडाव. एकनाथ-आमचे उपकार तुह्माला फेडावयाचे असल्यास तुझीं इतकेच करावें की, आजपासून चोरी करूं नये, लबाड बोलूं नये, पांडुरंग तुमचा चरितार्थ चालवील, अशी खातरी ठेवा. पोटासाठी मजुरी करून इमानाने आपल्यास जे परमेश्वर देईल त्याच्यावर उदरनिर्वाह करावा. तुझी चांगले हुशार लोक आहांत, सशक्त आहांत. शेताभातांत कामें करावी, आणि जे पोटाला धान्य मिळेल त्याची भाकरी आनंदाने खावी. (कणेरी घेऊन गिरजाबाई प्रवेश करिते. एकनाथ राण्याच्या तोंडांत चमच्याने कणेरी घालतो. राण्या हुशार होतो.) राण्या तुला चोरी कराविशी वाटते काय ? राण्या-वासराला जशी गई, नाइ तर तान्यामुलाला त्याची 'आई, तस तुमी लइ दयाळु हात. तुमच्या घरच अन्न मी आज खाल्ल. लइ गोड लागतय. त्याचा गून माझ्या मनावर असा झाला की, मला चोरी कराविशी आता वाटत नाही. हा घ्या डागिन्याचा डबा. हे समद डाग मनसबदार देशपांडया च्या घरच हयती. ज्येच त्येला हे परत करा. मी जातीचा म्हार, आन तुमी बामन, अस असूनशान तुमी माझ्यावर इकती दया केली की मला कोतवालाच्या शिपायाच्या सोधिन न करता तुमी उलट माझ्या अंगावर हात फिरविल्याबराबर माझ्या अंगात