पान:श्रीएकनाथ.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। विकसित होतात. शिवाय हा मार्ग सर्व जातींच्या पुरुषांस आणि स्त्रियांस मोकळा आहे त्याप्रमाणे वरील तीन नाहींत. ह्मणून भागवतधर्म ह्मणजे देवाच्या ठायीं शुद्ध भावाने अनुराग आणि तत्पूर्वक त्याचे भजन आणि पूजन हाच श्रेष्ठ मार्ग. Maittirinा डा. भांडारकर.rators वरील दोन उतारे केवळ आमच्या नाटकांतील नायक पात्र जो एकनाथ त्याची महती अर्वाचीन कालच्या विद्याचारसंपन्न मानलेल्या व एकप्रकारे समाजाचे धुरीणत्व धारण केलेल्या लोकांत किती मानली जात आहे, हे दर्शविण्याकरितां दिले आहेत. आमीं पूर्वी रचिलेल्या श्रीतुकाराम नाटकाविषयी डा. भांडारकर लिहितात की,--italioninx "In the play entitled “ S'ri-Tukûrâm," the author Mr. V. R. Shirvalkar has skilfully arranged the principal incidents in the life of the Saint, mentioned by Mahîpati, in a manner to bring about the dramatic unity of action. The play is interesting and impressive, and the style generally happy and worthy of a practised writer. The work, as a whole, is cerLainly a very meritorious production." परंतु, ज्याच्या चरित्रांत आजपावेतों या पृथ्वीच्या पाठीवर जितके महान, बुद्धिवान, पंडित, वक्ते, तत्वज्ञानी झणून होऊन गेले त्यांच्या तर्कशक्तीस पुरून अनंत उरलेला जो विश्वव्यापक परमेश्वर, त्याच्याच विषयी अति विस्तृत विचार भरलेले आहेत, अशा विचारांचे मजसारख्या अल्पमतीकडून नाटकरूपाने यथार्थ विवरण होणें परमाशक्य आहे. असो. प्रस्तुत नाटकांतील मुर्तजा निजामशहा बादशहा या पात्रासंबंधाने विशेष खुलासा करावयाचा आहे तो असाः-75064 ब्राह्मणी राज्य स्थापन करण्याची आख्यायिका सर्वत्र प्रसिद्धच आहे. सदर राज्याचे जे पांच विभाग झाले त्यापैकी अहमदनगरच्या निजामशाही गादीची स्थापना करणारा सुलतान अहमदशहा निजामशहा बहिरी हा होय. हा बादश हा छत्रपति शिवाजीमहाराजांप्रमाणे मोटा शूर व कारस्थानी असावा, असें इतिहासाच्या अवलोकनाने निदर्शनास येते. द्यानेच अहमदनगर शहर वसविलें, व इ. स. १५०८ मध्ये दौलताबादचा किल्ला मोठ्या पराक्रमाने सात वर्षे वेढा घालून ब्राह्मणी राज्याचा सुभेदार जा मलिक बुज्यू याजपासून घेतला. याने अनेक वेळां गुजराथ देशाचा प्रबळ बादशहा जो बहादुरशहा त्यास पराजित केले, व एके प्रसंगी तर त्याच्याच पीलखान्यांतील उन्मत्त हत्ती मध्यानरात्री त्याच्या झनानरवान्यांत सोडून सर्वांची दाणादाण उडवून त्यास पराजित केले. हा जातीचा देशस्थ ब्राह्मण असून मोगलाईतील पाथरी या गांवचा राहणारा होता. पुढे त्यास