पान:श्रीएकनाथ.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळक बापाचिये ताटी रिगे॥ आणि बापातच जेवऊं लागे । की तो संतोषलेनि वेगें । मुखचि वोढवी ॥६॥ तैसा मी जरी तुह्मांप्रती ॥ चावटी करितसे बाळमती ॥ तरी तुह्मी संतोषिजे ऐसी जाती ॥ प्रेमाची असे ॥ ७ ॥ अहो तान्हयाचे लागतां झटे ॥ तेणे अधिकचि पान्हा फुटे ॥ रोषे प्रेम दुणवटे ॥ पढियंतयाचेनि ॥८॥ ह्मणउनि मज लेकरु वाचेनि बोले ॥ तुमचें कृपाळूपण निदैलें। ते चेइलें ऐसें जी जाणवलें ॥ यालागी बोलिलों मी ॥९॥ श्रीज्ञानेश्वर. या न्यायाने अशा गहन विषयाचे आकलन करण्याचा शक्तयनुसार प्रयत्न केलेला आहे. “ एकनाथाला आकाशवाणी झाल्यानंतर त्यांनी बारा वर्षे अध्ययन क-10 रून बावीस हजार ग्रंथ लिहिला, अशी कथा आहे. त्यांच्या ग्रंथांत भागवतधर्म तर दिसलाच; पण चरित्रांतही दिसला. भागवतधर्म चरित्रांत 4. दाखविणे हे विशेष भाग्य एकनाथाचेच होते. हा भागवतधर्म सांगण्यास सोपा, पण आचरण्यास कठीण असा आहे. ज्ञानेश्वरांत गृहस्थाश्रम कमी, त्याचप्रमाणे रामदासांतही गृहस्थाश्रम कमी. ब्रह्मचाराच्या मागांत मोह कमी. परंतु एकनाथांनी गृहस्थाश्रमी राहून संसार वगैरे करून, भागवतधर्माचा प्रभाव विशेष रीतीने दाखविला, हे विशेष आहे. आपलें मुख्य कर्तव्य भगवंताची ओळख व्हावी, हे आहे. ती कशी होईल ह्याविषयी तुकारामांनी व ज्ञानदेवांनी सांगितले आहे. पण, एकनाथचरित्रांत त्याची परिस्फुटता विशेष दिसून येते. ह्या पुरुषाची आठवण व्हावी ह्मणून त्याची पुण्यतिथी केली पाहिजे. ह्यांच्यासारखे भाग्यवान पुरुष इतर देशांत झाले असतील, नाहीं असें नाहीं; पण आपणाला त्यांच्याशी कांहीं कर्तव्य नाही. तर जे एका रक्तामांसाचे, त्यांच्याविषयी आम्हांला विचार करावयाचा. त्यांच्या शरीराचे मांस जर आमच्यांत आहे, तर त्यांच्या विचारांचे मांस आमच्यांत कां असूं नये?" न्यायमूर्ति रानडे. " एकनाथस्वामींची वचनें घेऊन भागवतधर्माचे त्यांनी जै उपपादन । केले त्यांतील सारांश असा आहे की, ज्ञानमार्ग आणि योगमार्ग हेच दोन खरे मानिले, तर पुष्कळ साध्या मनुष्यांस उन्नतीची आशा नाहीं असें । होऊं लागेल. कारण की, ते मार्ग अत्यंत दुष्कर, एखाददुसऱ्यासच साध्य. केवळ कर्ममार्गाचे अवलंबन केले असतां जडता प्राप्त होते, अंतरात्मा विकसित होत नाही; परंतु भागवतमार्ग सर्वांस-साध्याभोळ्यांससुद्धा-साध्य आणि त्याच्यायोगें प्रेमळता, दया, क्षमा इत्यादि गुण अंतरात्म्याच्या ठायीं